शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेटच्या अध्यक्षपदी श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 03:05 IST

स्वतंत्र विदर्भासह देशभरात अनेक छोट्या राज्यांची मागणी सुरू आहे. शासन दरबारी त्यांची मागणी रेटून धरण्याच्या ..

५ मे रोजी स्वीकारणार पदभार : विदर्भाच्या मागणीला मिळणार ताकदनागपूर : स्वतंत्र विदर्भासह देशभरात अनेक छोट्या राज्यांची मागणी सुरू आहे. शासन दरबारी त्यांची मागणी रेटून धरण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेट (एनएफएनएस) ही संघटना कार्य करीत असते. या संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भासह देशातील छोट्या राज्यांच्या मागणीला आणखी ताकद मिळेल. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी शुक्रवारी नागपुरात यासंबंधीची माहिती देत आपण हे पद स्वीकारण्यास तयार असल्याचे जाहीर केले. येत्या ५ मे रोजी नवी दिल्ली येथे हे पद स्वीकारणार आहोत, असे अ‍ॅड. अणे यांनी सांगितले. माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए. संगमा यांनी या फेडरेशनची स्थापना केली होती. तेलंगणा राज्याच्या मागणीमध्ये या फेडरेशनची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये तेलंगणाचा मुद्दा लावून धरला होता. बुंदेलखंड राज्यासाठी लढणारे राजा बुंदेला हे या फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आपल्याला अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगितले होते तेव्हा आपण त्यांना केवळ एकच अट घातली होती, ती म्हणजे बुंदेलखंडसह विदर्भाची मागणी दिल्ली दरबारी लावून धरणे ही होय.आपण हे पद स्वीकारण्यास तयार आहोत. बुंदेलखंडसोबत विदर्भाचा मुद्दा आपण दिल्लीमध्ये लावून धरू.