दुकानदार, फेरीवाल्यांनी नियमांचे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:40+5:302021-04-07T04:08:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जनतेसोबतच दुकानदार व फेरीवाल्यांनी या ...

Shopkeepers, peddlers should follow the rules | दुकानदार, फेरीवाल्यांनी नियमांचे पालन करावे

दुकानदार, फेरीवाल्यांनी नियमांचे पालन करावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जनतेसोबतच दुकानदार व फेरीवाल्यांनी या नियमांचे पालन करावे. लहान दुकानदार, व्यापारी, संघटना यांनी निर्बंधांबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत निर्बंधांसह सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर खासगी आस्थापनात अनेक तरुण-तरुणी कार्यरत आहेत. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसाचे कोरोना निगेटिव्ह ‘आरटीपीसीआर’ प्रमाणपत्र बाळगावे लागेल. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तींकडून एक हजार रुपये दंड घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ब्रेक द चेन’मध्ये नवीन सेवांचा अंतर्भाव जनजीवन सुरळीत राहण्यासाठी केला आहे. कोरोना नियंत्रणासह अर्थचक्रासोबतच विद्यार्थी, औद्योगिक कामगार, प्रवासी यांची दळणवळण सुविधा सुरळीत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Shopkeepers, peddlers should follow the rules