शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

नागपुरात साडेसहा लाखांचा मास्कचा साठा जप्त ,  दुकानदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 11:35 PM

शहरामध्ये कोरोनासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही सुमार साडेसहा लाख रुपये किमतीचा मास्कचा साठा दडवून ठेवणाऱ्या दुकानदाराला शनिवारी मुद्देमालासह अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरामध्ये कोरोनासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही सुमार साडेसहा लाख रुपये किमतीचा मास्कचा साठा दडवून ठेवणाऱ्या दुकानदाराला शनिवारी मुद्देमालासह अटक करण्यात आली.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नागपूर शहराचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम (युनिट क्र. ४) यांनी ही कारवाई केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा रेस्टॉरंट मागील शॉप नं. ११, जीवनधारा नं. १, भिवसरिया इंडस्ट्रीज या दुकानात मास्कचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक के. व्ही. चौगले यांच्यासह त्यांचे पथक तसेच अन्न नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी रोहिणी पाठराबे, अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार उपलप, अन्न निरीक्षक नीरज लोहकरे, शरद मोरे, अमरदीप मेश्राम व पंचांसह धाड घातली असता तिथे ६ लाख ४५ हजार १२५ रुपये किमतीचे १४,२२५ नग मास्क -३ प्लाय साठा करून ठेवल्याचे दिसले. हा माल जप्त करून दुकान मालक नवल अग्रवाल (५५) १०२, शांतिभुज अपार्टमेंट, शांतिनगर याला ताब्यात घेऊन भादंविच्या कलम १८८, २७०, सहकलम जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७. राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम ५१(ब), साथ रोग अधिनियम कलम ३, वैध मापन शास्त्र कायदा कलम १८(९), सह-वैध मापन शास्त्र (अवेष्टित वस्तू) ६(१) अन्वये कारवाई करून लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.भरारी पथकांची निर्मितीया घटनेनंतर पोलिसांनी भरारी पथक तयार केले आहेत. झोन ४ हद्दीतील सर्व मेडिकल स्टोअर्स दुकानांना भेट देऊन मास्क आणि सॅनिटाझरची शासनमान्य दरातच साठवणूक आणि विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विक्रेते जीवनावश्यक वस्तूंची अधिक दराने विक्री करताना आढळल्यास किंवा तशा तक्रारी आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.औषध मार्केटमध्ये दोन दुकानांवर कारवाई गुन्हे शाखेचे युनिट - ३ व एफडीएच्या वैधमापन विभागाने गांधीबाग होलसेल औषध मार्केटमध्ये संयुक्तपणे कारवाई केली. मेसर्स लक्ष्मी एजन्सी मध्ये तपासणी केल्यावर तेथील सॅनिटायझर प्रमाणित नसल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एम. चांडक अ‍ॅण्ड कंपनीचे मास्क नियमानुसार प्रमाणित नव्हते. त्यामुळे वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ व २०११ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस