धक्कादायक! आदासा मंदिर परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या

By जितेंद्र ढवळे | Updated: September 29, 2023 15:51 IST2023-09-29T15:50:25+5:302023-09-29T15:51:33+5:30

सावनेर पोलिसांनी केली तिघांना अटक

Shocking! Youth stoned to death in Adasa temple area, three held | धक्कादायक! आदासा मंदिर परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या

धक्कादायक! आदासा मंदिर परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या

नागपूर : गणेश विसर्जनाची सर्वत्र धामधूम सुरू असताना सावनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र आदासा येथे गुरुवारी (दि. २८) रोजी शाब्दिक वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. अमोल वामन गायकवाड (३५, रा. सोनपूर) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंकित कडू (२७), प्रवीण उईके (२७) व प्रभाकर कोहळे (३०, रा. आदासा) हे तिघेही गणेश मंदिर परिसरातील हनुमान मंदिराजवळ दुपारी ३ वाजेच्या सुमारास दारू पीत होते. त्या ठिकाणी अमोल गायकवाड मित्रांसह पोहोचला. त्या ठिकाणी त्यांचा दारूवरून आपसात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर त्यांची आपसात झटापट झाली. यानंतर तिन्ही आरोपींनी दगडाने वार केल्याने अमोलचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र मानकर ताफ्यासह आदासा येथे दाखल झाले. पोलिसांनी हितज्योती फाऊंडेशनचे हितेश बन्सोड यांच्या सहकार्याने अमोलला याला सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती अमोल याला मृत घोषित केले. सावनेर पोलिसांनी उपरोक्त तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Shocking! Youth stoned to death in Adasa temple area, three held