धक्कादायक! स्कूलबस चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By योगेश पांडे | Updated: March 17, 2023 18:55 IST2023-03-17T18:54:50+5:302023-03-17T18:55:26+5:30

एका नामांकित शाळेच्या स्कूल बस चालकाने तेथील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे शाळेत खळबळ उडाली असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Shocking! Girl student molested by school bus driver | धक्कादायक! स्कूलबस चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

धक्कादायक! स्कूलबस चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नागपूर : एका नामांकित शाळेच्या स्कूल बस चालकाने तेथील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे शाळेत खळबळ उडाली असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

शशिकांत भोपेंदर थॉमस (वय ६७, बाबा मल्ले ले आऊट, येरखेडा, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. शशिकांत एका नामांकित शाळेतील स्कूल बसचा चालक असून १० वर्षीय पीडित मुलगी त्याच्या बसमधूनच शाळेत येणे-जाणे करायची. त्याने शाळेच्या बाहेरच हा घृणास्पद प्रकार केला. त्याने विद्यार्थिनीला बसच्या सीटवर बसविण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. यामुळे मुलगी घाबरली व तिने तिच्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली. पालकांनी जुनी कामठी पोलिस ठाणे गाठून चालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शशिकांत विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

Web Title: Shocking! Girl student molested by school bus driver