शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

धक्कादायक : नागपुरात अनेक पॉश हॉटेलमध्ये चालतोय देह व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:12 IST

नागपुरातील अनेक पॉश हॉटेलमध्ये देहव्यापाराचा अड्डा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदासपेठ, सदर आणि वर्धा रोडवरील या हॉटेलमध्ये चालत असलेला देहव्यापार आता हाय प्रोफाईल बनला आहे. शहर पोलिसांनाही हा सर्व प्रकार माहीत आहे, परंतु काय कारण आहे माहीत नाही, ते हॉटेल संचालकांना रंगेहात पकडू शकत नाही. देहव्यापाराच्या टोळीतील एका सदस्याची विचारपूस केली असता ही माहिती पुढे आली.

ठळक मुद्देदेहव्यापाराच्या टोळीतील एका सदस्याची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील अनेक पॉश हॉटेलमध्ये देहव्यापाराचा अड्डा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदासपेठ, सदर आणि वर्धा रोडवरील या हॉटेलमध्ये चालत असलेला देहव्यापार आता हाय प्रोफाईल बनला आहे. शहर पोलिसांनाही हा सर्व प्रकार माहीत आहे, परंतु काय कारण आहे माहीत नाही, ते हॉटेल संचालकांना रंगेहात पकडू शकत नाही. देहव्यापाराच्या टोळीतील एका सदस्याची विचारपूस केली असता ही माहिती पुढे आली.पोलिसांनी अलीकडेच १२ दिवसाच्या आत देहव्यापाराचे ६ अड्डे उघडकीस आणले. सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल गंगा-काशी येथील दलाल सचिन सोनारकर आणि धंतोलीतील केपी इन हॉटेलमध्ये प्रणिता जयस्वाल हिची अटक ही महत्त्वाची मानली जात आहे. दोघांकडे उजबेकिस्तानमधील तरुणी सापडल्या. सचिन मागील दहा वर्षांपासून देहव्यापारात सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. हॉटेल गंगा-काशीमध्ये झालेल्या कारवाईने सीताबर्डी पोलीसही हादरले आहे. सीताबर्डी पोलीस सचिनकडून काही विशेष माहिती मिळवू शकलेले नाही. परंतु प्रणिताकडून मात्र शहरात पसरलेल्या देहव्यापाराच्या नेटवर्कची माहिती मिळाली.सूत्रानुसार मोठे ग्राहक सुरक्षित जागेला प्राधान्य देतात. अनेकदा तर ते स्वत:च हॉटेलची खोली बुक करतात. शहरातील पॉश हॉटेलमध्ये त्यांची ‘सेटींग’ असल्याने त्यांना सहजपणे खोली मिळते. दलालाचे काम केवळ तरुणी उपलब्ध करून देणे असते. ते ग्राहकाच्या बोलावलेल्या हॉटेलमध्ये तरुणी सोडून निघून जातात. या प्रकारच्या ग्राहकांना दलालही विशेष प्राधान्य देतात. असे सांगितले जाते की, शहरात असे ८ ते १० मोठे दलाल आहे. प्रत्येक दलालाकडे या प्रकारचे ग्राहक असतात. ग्राहकाचा कॉल आल्यास एका दलालाकडे तरुणी नसेल तर ते दुसऱ्या दलालाची मदत घेतात. दलाल स्वत: किंवा आपल्या एखाद्या साथीदाराच्या माध्यमाने तरुणी ग्राहकापर्यंत पोहोचवतात.पोलिसांच्या तपासात काही मोठ्या पॉश हॉटेलची नावे समोर आली आहेत. आतापर्यंत देहव्यापाराच्या अड्ड्यावर पकडण्यात आलेले दलाल हे या हॉटेलची नावे सांगण्यास मागेपुढे पाहात होते. परंतु हॉटेलची नावे समोर आल्यानंतरही पोलिसांकडे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ठोस असे पुरावे नाहीत. या हॉटेलच्या संचालकांचे संबंधही वरपर्यंत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच पोलीस त्यांची नावे जाहीर करण्यास मागेपुढे पाहत आहे.उपराजधानीतील मोठे दलाल मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमाने देहव्यापाराचा धंदा करतात. ते दुसºया राज्यातील दलालांच्या मदतीने येथे तरुणी बोलावतात. यात दिल्लीचा अश्विन, जॉन, मुंबईचा सिकंदर, आलोक, बेंगळुरुची ममता या दलालांचा प्रामुख्याने समावेश आहे. नागपुरात सचिन सोनारकर याच्यासह अमन, रेहान, अमजद, जॉन, मनोज, कुमार, विशाल आणि सीपी हे देह व्यापाराशी जुळले असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाhotelहॉटेल