शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

वैदर्भीय कलावंतांच्या चित्र आणि स्कल्पचरने रंगणार श्लोक प्रदर्शन

By admin | Updated: January 9, 2015 00:47 IST

प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांना समोर आणण्यासाठी आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्लोक’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद लाभला.

जागतिक ख्यातीचे कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते उद्घाटन : दर्डा कलाविथिकेत रविवारी प्रारंभ नागपूर : प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांना समोर आणण्यासाठी आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्लोक’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामुळेच श्लोकच्या प्रदर्शनातील कलाकृती पाहण्यासाठी कलारसिकांमध्ये कुतूहल असते. यंदा नागपूर विभागातील प्रदर्शन रविवार दि. ११ जानेवारीपासून जवाहरलाल दर्डा कलाविथिकेत प्रारंभ करण्यात येणार असून यात वैदर्भीय कलावंतांच्या उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना भुरळ पाडणार आहेत. ‘श्लोक’ प्रदर्शनाची संकल्पना शीतल ऋषी दर्डा यांची आहे. त्यांच्या कल्पनेतूनच या प्रदर्शनाला प्रारंभ झाला आणि अल्पावधीत या प्रदर्शनाने कलारसिकांचे लक्ष वेधले आहे. जागतिक स्तरावरही ‘श्लोक’ चित्र प्रदर्शनाची दखल घेण्यात आली आहे. हे प्रदर्शन महाराष्ट्रात एकूण पाच ठिकाणी आयोजित करण्यात येते. यात नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादचा समावेश आहे. या पाच ठिकाणी महाराष्ट्रातील संबंधित विभागाचे प्रतिनिधित्व उमटते. या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ‘पोर्ट्रेट’ कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा, श्लोकच्या संचालिका शीतल ऋषी दर्डा उपस्थित राहतील. कामत यांचा पौराणिक विषयांचा अभ्यास करून त्याला वास्तववादी शैलीत चितारण्याचा प्रयत्न रसिकांना अवाक करणारा आहे. याप्रसंगी कला आणि कलेचा पौराणिक संदर्भ विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यानंतर दुपारी १२ वाजता ते ‘पोर्ट्रेट’ चे प्रात्यक्षिकही सादर करणार आहेत. कलारसिकांसाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभविणे ही पर्वणीच असणार आहे. या प्रदर्शनासाठी विदर्भातील चित्रकार आणि शिल्पकार यांच्याकडून त्यांच्या कलाकृती मागविण्यात आल्यात. त्यानंतर मुंबई येथे एका तज्ज्ञ समितीने कलाकृतींची निवड केली. आलेल्या कलाकृतीतून निवडण्यात आलेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. यात वय वर्षे ६ ते वयाची ७१ वर्षे झालेल्या निवृत्त कलाशिक्षकांचा सहभाग आहे. हे प्रदर्शन कलारसिकांसाठी १३ जानेवारीपर्यंत सकाळी १०. ३० ते रात्री ८. ३० पर्यंत खुले राहणार असून या सर्व कलाकृतींचा आनंद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन जवाहरलाल दर्डा कलाविथिकेचे समन्वयक मिलिंद लिंबेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)