शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिवराजसिंग चौहान यांची संघ मुख्यालयाला भेट

By admin | Updated: April 13, 2016 03:15 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.

१० दिवसांत दुसरी भेट : भय्याजी जोशी यांच्याशी चर्चानागपूर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. मध्य प्रदेशमधील गो-अभयारण्याचे लोकार्पण तसेच वैचारिक कुंभ मेळाव्यात मार्गदर्शन करण्याचे निमंत्रण जोशी यांना देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ९ दिवसांपूर्वीच चौहान यांनी संघ मुख्यालयात येऊन सरसंघचालकांचीदेखील भेट घेतली होती. लगेच झालेल्या त्यांच्या या दौऱ्यामुळे विविध चर्चांनादेखील उधाण आले आहे.मध्य प्रदेशातील उज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा साजरा क ेला जाणार आहे. संघाने महाकुं भ वैचारिक कुंभमेळा म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून यावर पाच हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. भव्यदिव्य महाकुंभाच्या नियोजनासोबतच राजकीय व शेतीविषयक बाबींवर चौहान यांनी जोशी यांच्याशी सखोल चर्चा केली. तब्बल अडीच तास ते संघ मुख्यालयात होते.(प्रतिनिधी)भेटीमागे दडले काय ?एकाच कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन दोनदा चौहाण संघ मुख्यालयात आल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ३ एप्रिल रोजी त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. व्यापम् घोटाळ्यासंदर्भात चौहान यांच्यावर टीका होत आहे. विशेषत: माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. संघाच्या पदाधिकाऱ्यांवरदेखील या घोटाळ्याबाबत दोषारोप झाले होते. मध्य प्रदेशचे मंत्री अरविंद मेनन यांना राष्ट्रीय पातळीवर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. हे मध्य प्रदेशातील राजकीय बदलांचे संकेत मानण्यात येत असल्याचीदेखील चर्चा आहे. त्यामुळे निमंत्रणाचे कारण समोर करून राजकीय पटलावरील अस्वस्थतेवर या भेटीत चर्चा झाली असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. चौहान यांनी या भेटीतील तपशील सांगण्यास नकार दिला. बाबासाहेबांच्या जन्मगावी होणार भव्य कार्यक्रमडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांचे जन्मगाव महू येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यात सहभागी होणार आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. परंतु आम्ही असे कुठलेही पत्र पाठविले नसल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.