शिवसेनेकडून विरोधी पक्षनेत्याला फोडण्याचा डाव, वडेट्टीवारांना ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 04:39 IST2019-08-03T04:38:55+5:302019-08-03T04:39:23+5:30

वडेट्टीवार म्हणाले, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मला २५ वेळा फोन केले.

Shiv Sena offers to show opposition to party leader; | शिवसेनेकडून विरोधी पक्षनेत्याला फोडण्याचा डाव, वडेट्टीवारांना ऑफर!

शिवसेनेकडून विरोधी पक्षनेत्याला फोडण्याचा डाव, वडेट्टीवारांना ऑफर!

नागपूर : भारतीय जनता पक्षात सध्या इतर पक्षातील नेत्यांची मेघाभरती सुरू असतानाच शिवसेनेने देखील काही नेत्यांसाठी गळ टाकून आहे. कॅबिनेट मंत्री पदाचे प्रलोभन दाखवून मला शिवसेनेत येण्याची आॅफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

वडेट्टीवार म्हणाले, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मला २५ वेळा फोन केले. यातील २३ वेळा मी फोन उचलला नाही. त्यांनी मला शिवसेनेत येण्याची ‘आॅफर’ दिली. तुमच्या येण्यामुळे आम्ही परत सत्तेत येऊ. तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल, असे प्रलोभनदेखील दिले. मात्र माझी भूमिका स्पष्ट आहे.

Web Title: Shiv Sena offers to show opposition to party leader;