शिंदे सेनेची ऊर्जा क्षेत्रात एन्ट्री, राज्य विद्युत कर्मचारी सेनेची स्थापना; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिन्हाचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 23:52 IST2025-06-30T23:52:36+5:302025-06-30T23:52:52+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नव्या कामगार संघटनेच्या स्थापनेची घोषणा करताना तिच्या चिन्हाचे अनावरण केले.

शिंदे सेनेची ऊर्जा क्षेत्रात एन्ट्री, राज्य विद्युत कर्मचारी सेनेची स्थापना; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिन्हाचे अनावरण
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यातील ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेना या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेत शिवसेना (उबाठा) च्या कामगार संघटनेतील अनेक पदाधिकारीही सहभागी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नव्या कामगार संघटनेच्या स्थापनेची घोषणा करताना तिच्या चिन्हाचे अनावरण केले.
शनिवार रोजी नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात यासंदर्भात माहिती देण्यात आली. यासोबतच संघटनेचे कार्य अधिकृतपणे सुरू झाले आहे.सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, राज्यमंत्री आशीष जायसवाल, संघटनेचे मार्गदर्शक आमदार कृपाल तुमाने, आमदार मनीषा कायंदे आणि किरण पांडव यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात सांगण्यात आले की, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेना ही संघटना वीज कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करेल. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
संघटनेचे अध्यक्ष योगेश विटनकर, कार्याध्यक्ष मनोज मेश्राम व प्रवीण पाठराबे, महासचिव डॉ. अविनाश आचार्य, दिलीप आवळे, जीवन डहाट, आशीष इंगळे, श्रीरंग दहासहस्त्र आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.