शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

त्यांनी गाण्यांमधून मांडले तथागत बुद्धाचे अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:49 PM

अ‍ॅनी चोयींग ड्रोलमा या नेपाळमध्ये राहणाऱ्या भिक्षूनी, मात्र गळ्यातील गोड स्वरांनी त्या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका. एखाद्या भिक्क्षूने शांतचित्त बसून बुद्धमंत्र म्हणावे असे त्यांचे गायन. याच शांतिमय स्वरांनी तथागत बुुद्धाचे अध्यात्म त्या जगासमोर मांडत आहेत.

ठळक मुद्देनेपाळच्या राजदूत अ‍ॅनी ड्रोलमा यांचे शांतिमय गायन : आंतरराष्ट्रीय समता परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅनी चोयींग ड्रोलमा या नेपाळमध्ये राहणाऱ्या भिक्षूनी, मात्र गळ्यातील गोड स्वरांनी त्या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका. एखाद्या भिक्क्षूने शांतचित्त बसून बुद्धमंत्र म्हणावे असे त्यांचे गायन. याच शांतिमय स्वरांनी तथागत बुुद्धाचे अध्यात्म त्या जगासमोर मांडत आहेत. मनाला एकाग्र करणाऱ्या त्यांच्या स्वरांचा अनुभव शनिवारी नागपूरकरांनीही घेतला. ‘फूल पाहणाऱ्यांना जग फुलांसारखेच दिसते व काटे पाहणाऱ्यांना काट्यासारखे... हे बुद्धा, सर्वांची आत्मा शुद्ध कर, आम्हाला काट्यामधूनही फुले दिसावी...’ व ‘प्रत्येकाच्या हृदयात दया आणि प्रेम भरू दे, हे बुद्धा, अशा दयावंतांना विजय मिळू दे...’ अशा नेपाळी भाषेतील बुद्धगीतांनी त्यांनी श्रोत्यांच्या हृदयाच्या तारा बुद्धाशी जोडल्या.अ‍ॅनी ड्रोलमा या नेपाळमधील अनाथ मुलांसाठी शाळा चालविणाऱ्या भिक्क्षूनी. बुद्धाचे मंत्र स्वरात गाण्याची त्यांना आवड. स्टीव्ह टिबेट्स या अमेरिकन संगीतकाराने त्यांना एकदा ऐकले आणि थेट अमेरिकेला बोलावले. त्यांच्या गायनाचे अल्बम बनवून घेतले आणि त्या बुद्धविचार गाणाऱ्या गायक झाल्या. गेल्या १५ ते १८ वर्षांत त्यांनी जगभरात असंख्य कार्यक्रमातून त्यांच्या एकाग्रचित्त गायनातून बुद्धाचे आध्यात्मिक ज्ञान लोकांना ऐकवले आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेंतर्गत दीक्षाभूमीवर त्यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान त्यांनी काही बुद्धाची कथा व त्यांचे तत्त्वज्ञान सांगणारी नेपाळी भाषेतील गाणी, काही हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या बौद्ध परंपरेतील गाणी होती आणि बहुतेक बुद्ध मंत्र होते. लहान मुले व तरुणांना तत्त्वज्ञान सांगणारे प्रवचन नको असते. त्यामुळे बुद्धाचे विचार गीतांच्या रूपात सांगत असल्याचे त्या म्हणाल्या. खरे म्हणजे ते गायन नव्हते तर बुद्धाचे मंत्र स्वरात म्हणणेच होते. त्यांच्या शांत आणि धीरगंभीर स्वरांनी श्रोत्यांनाही ध्यानमग्न करून त्यांच्या हृदयाच्या तारा तथागत बुद्धाशी एकरूप केल्या.यावेळी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार डॉ. मिलिंद माने व बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांच्या हस्ते अ‍ॅनी ड्रोलमा यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बौद्ध प्रतिनिधी, भिक्क्षू संघ व नागपूरकर श्रोता उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर