शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी व्हीलचेअरवर असूनही घेतली मेघे कुटुंबीयांची भेट; मेघेंच्या आठवणींनी पवार झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:15 IST

Nagpur : ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निधनामुळे मेघे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी विमानाने नागपुरात दाखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निधनामुळे मेघे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी विमानाने नागपुरात दाखल झाले. ते व्हीलचेअरवर बसूनच विमानतळाबाहेर आले व तेथून मेघे यांच्या निवासस्थानी देखील व्हीलचेअरवर बसूनच पोहचले.

पवार यांनी दत्ता मेघे यांचे पुत्र माजी आ. सागर मेघे, आ. समीर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबीयांची भेट घेतली. मेघे यांच्याशी जुळलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग उपस्थित होते. चर्चेत मेधेंच्या आठवणींनी पवार काहीसे भावुकही झाले. यानंतर सायंकाळी ते विमानाने मुंबईसाठी रवाना झाले. प्रकृती ठीक नसतानाही शरद पवार व्हीलचेअरवर बसून मेधे कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले यातून त्यांचे या कुटुंबीयांप्रती असलेला जिव्हाळा दिसून आला. प्रारंभी विमानतळावर पक्षाचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे, माजी आ. प्रकाश गजभिये, किशोर गजभिये, सलील देशमुख, राजाभाऊ टांकसाळे, वेदप्रकाश आर्य आदींनी भेट घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar, in wheelchair, visits Meghe family, reminisces emotionally.

Web Summary : Despite health issues, Sharad Pawar visited the Meghe family in Nagpur to offer condolences after Datta Meghe's passing. Pawar, using a wheelchair, reminisced about old memories with the family, becoming emotional during the visit before returning to Mumbai.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDatta Megheदत्ता मेघेnagpurनागपूर