शरद पवारांनी व्हीलचेअरवर असूनही घेतली मेघे कुटुंबीयांची भेट; मेघेंच्या आठवणींनी पवार झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:15 IST2026-03-25T15:15:02+5:302026-03-25T15:15:29+5:30

Nagpur : ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निधनामुळे मेघे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी विमानाने नागपुरात दाखल झाले.

Sharad Pawar met Meghe's family despite being in a wheelchair; Pawar became emotional with Meghe's memories | शरद पवारांनी व्हीलचेअरवर असूनही घेतली मेघे कुटुंबीयांची भेट; मेघेंच्या आठवणींनी पवार झाले भावुक

Sharad Pawar met Meghe's family despite being in a wheelchair; Pawar became emotional with Meghe's memories

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निधनामुळे मेघे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी विमानाने नागपुरात दाखल झाले. ते व्हीलचेअरवर बसूनच विमानतळाबाहेर आले व तेथून मेघे यांच्या निवासस्थानी देखील व्हीलचेअरवर बसूनच पोहचले.

पवार यांनी दत्ता मेघे यांचे पुत्र माजी आ. सागर मेघे, आ. समीर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबीयांची भेट घेतली. मेघे यांच्याशी जुळलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग उपस्थित होते. चर्चेत मेधेंच्या आठवणींनी पवार काहीसे भावुकही झाले. यानंतर सायंकाळी ते विमानाने मुंबईसाठी रवाना झाले. प्रकृती ठीक नसतानाही शरद पवार व्हीलचेअरवर बसून मेधे कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले यातून त्यांचे या कुटुंबीयांप्रती असलेला जिव्हाळा दिसून आला. प्रारंभी विमानतळावर पक्षाचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे, माजी आ. प्रकाश गजभिये, किशोर गजभिये, सलील देशमुख, राजाभाऊ टांकसाळे, वेदप्रकाश आर्य आदींनी भेट घेतली.

Web Title : शरद पवार व्हीलचेयर पर, मेघे परिवार से मिले, भावुक हुए।

Web Summary : स्वास्थ्य समस्याओं के बावजूद, शरद पवार दत्ता मेघे के निधन पर शोक व्यक्त करने नागपुर में मेघे परिवार से मिलने गए। व्हीलचेयर का उपयोग करते हुए, पवार ने परिवार के साथ पुरानी यादें ताजा कीं और यात्रा के दौरान भावुक हो गए, फिर मुंबई लौट आए।

Web Title : Sharad Pawar, in wheelchair, visits Meghe family, reminisces emotionally.

Web Summary : Despite health issues, Sharad Pawar visited the Meghe family in Nagpur to offer condolences after Datta Meghe's passing. Pawar, using a wheelchair, reminisced about old memories with the family, becoming emotional during the visit before returning to Mumbai.