शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांमध्ये शरद जोशींनी स्वाभिमान जागृत केला

By admin | Updated: December 27, 2015 03:24 IST

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाला नवी दिशा दिली. त्यांनी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला.

मान्यवरांचे मत : तिरपुडे महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजलीनागपूर : शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाला नवी दिशा दिली. त्यांनी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला. त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे काम केले, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.सिव्हिल लाईन्स येथील तिरपुडे महाविद्यालयाच्या ठवरे सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी राजकुमार तिरपुडे होते. व्यासपीठावर निवृत्त पोलीस महासंचालक पी. के. बी. चक्रवर्ती, अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, दिलीप नरवडिया, धनंजय धार्मिक, इंद्रजित आमगावकर, अरुण केदार उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे राम नेवले म्हणाले, शरद जोशींनी कांदा, ऊस, कापसाला भाव मिळावा यासाठी अनेकदा आंदोलने केली. अनेक मेळावे घेऊन त्यांनी देशाच्या विकासाचे मूळ शेतमालाच्या भावात आहे हे सरकारला पटवून दिले. शेतकऱ्यांना कर्जात मरू देणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. परंतु त्यांच्या अकस्मात निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, शरद जोशींनी शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा मंत्र देऊन त्यांच्यात आत्मविश्वास जागृत केला. आत्मविश्वासावर शेतकरी संघटना उभी करून तरुण शेतकऱ्यांना संघटित केले. माजी पोलीस महासंचालक पी. के. बी. चक्रवर्ती म्हणाले, देशाला नवा विचार देऊन शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी शरद जोशींसोबत केलेल्या आंदोलनांना उजाळा देऊन शेतकऱ्यांचा चांगला नेता देशाने गमावल्याची खंत व्यक्त केली. संचालन अरुण केदार यांनी केले. कार्यक्रमाला बाबा कोंबाडे, वामनराव कोंबाडे, तिरपुडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)