शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी घोटाळा ! काटोलकरांनी सह्या केलेली वेतन देयके केली जप्त; पोलिसांकडे तक्रारीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:35 IST

Nagpur : यवतमाळ जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने वर्धा येथून अटक करून २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने वर्धा येथून अटक करून २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे. पोलिसांनी बुधवारी त्यांच्या कार्यकिर्दीत करण्यात येणाऱ्या कामाची तपासणी करताना वेतन अधीक्षक वेतन व भविष्य निधी कार्यालयातून काटोलकरांनी ज्या वेतन देयकावर सह्या केल्या ती देयके जप्त केली आहे. याशिवाय पोलिसांना शिक्षक व शिक्षक संघटनांकडूनही काटोलकर यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त होत आहे.

काटोलकर हे जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी असताना त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे माहिती असूनसुद्धा त्यांचे वेतन संबंधाने शाळेकडून प्रस्तावाची शहानिशा न करता त्यांचे नियमित वेतन तसेच थकीत वेतन काढले. त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची अंदाजे १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर अल्पसंख्याक शिक्षण संस्थेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीसंदर्भात सखोल चौकशीची मागणी शिक्षक संघटनांकडून केली आहे. सर्वश्री महाविद्यालयातील एका शिक्षिकेला बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शालार्थ आयडी मंजूर केला असल्याचीही तक्रार सदर पोलिसांत करण्यात आली होती.

जवळच्या संस्थाचालकांवर पोलिसांची नजर

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काटोलकर वर्धा, भंडारा, नागपुरात शिक्षणाधिकारी व नागपूर शिक्षण मंडळात सहसचिव असताना त्यांच्या जवळीक असलेल्या शिक्षण संचालकांवरही पोलिसांनी नजर आहे. काटोलकर यांचे इतर साथीदारांचा शोध पोलिस पथकामार्फत सुरू आहे. काटोलकरांनी ज्या शाळांच्या शिक्षकांच्या प्रस्तावाची शहानिशा न करता नियमित व थकीत वेतन काढून दिले. त्या शाळांचे संस्थाचालक पोलिसांच्या टार्गेटवर आहे. पोलिस त्या दृष्टिकोनातून तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे तक्रार करूनही त्यांनी संबंधित शिक्षिकेला शालार्थ आयडी मंजूर केला होता, अशी शिक्षकाची तक्रार आहे. त्यांच्या पत्नीच्या नियुक्ती संदर्भातील तक्रारीही करण्यात आल्या आहे. ते भंडारा जिल्ह्यात शिक्षणाधिकारी असताना त्यांनी याच प्रकारचे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याचाही तपास पोलिस करीत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shalarth ID Scam: Katolkar's Salary Documents Seized, Complaints Increase

Web Summary : Ravindra Katolkar arrested in Shalarth ID scam. Salary documents signed by him seized. He's accused of misappropriating funds, issuing fraudulent IDs, causing a financial loss of over ₹12 crore. Police investigate further accomplices and institutions involved.
टॅग्स :Educationशिक्षणfraudधोकेबाजीnagpurनागपूर