शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वेकाेलितील स्फाेटाचे दगड घरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : वेकाेलिच्या गाेकूल खाणीत काेळसा काढण्यासाठी अधिक क्षमतेचे स्फाेट घडवून आणले जात असून, या स्फाेटांमुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : वेकाेलिच्या गाेकूल खाणीत काेळसा काढण्यासाठी अधिक क्षमतेचे स्फाेट घडवून आणले जात असून, या स्फाेटांमुळे उडणारे दगड चक्क पिरावा गावात येऊन पडतात. मागच्या आठवड्यात अशाच एका दगडाने बैल जखमी झाला हाेता. आंदाेलनानंतर असा प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही वेकाेलिच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्यानंतरही शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी स्फाेटामुळे उडालेले दगड घरांवर पडले आणि कवेलू फुटल्याने नागरिकांचे नुकसान झाले.

गाेकूल या ओपन कास्ट माईनमध्ये राेज अधिक तीव्रतेचे स्फाेट घडवून आणले जातात. या स्फाेटांमुळे जमिनीला प्रचंड हादरे बसत असल्याने लहानग्यांपासून तर माेठ्यांपर्यत सर्व दहशतीत जगत आहेत. आठवडाभरापूर्वी स्फाेटामुळे उडालेला दगड लागल्याने दाेन बैल जखमी झाले हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेकाेलिच्या प्रवेशद्वाराजवळ आंदाेलन केले. असे स्फाेट यापुढे घडवून आणले जाणार नाही, असे लेखी आश्वासन वेकाेलिच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले हाेते.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी स्फाेटामुळे उडालेले दगड नरेश गणपत पडोळे रा. पिरावा, ता. भिवापूर यांच्या घरावर पडल्याने कवेलू फुटले. ते याच खाणीत नाेकरी करीत असून, उमरेड शहरात राहायला गेले. त्यांनी पिरावा येथील घर किरायाने दिले आहे. दगड पडला त्यावेळी घरी कुणीही नव्हते. मात्र, कवेलू फुटल्याने नुकसान झाले. वेकाेलि प्रशासन नागरिकांना वारंवार आश्वासने देऊन शांत करते तर दुसरीकडे त्यांना सतत त्रास देते. पिरावावासीयांचे राेज हाेणारे हाल व वेकाेलिची प्रशासनाची दादागिरी स्थानिक लाेकप्रतिनिधी व प्रशासनाला माहिती आहे. मात्र, ते हा तमाशा बघण्यात ते धन्यता मानत आहेत.

...

सरपंचाला धमकावले

लेखी आश्वासन दिल्यानंतर स्फाेटामुळे उडालेले दगड घरावर कसे आले, याबाबत विचारणा करण्यासाठी पिरावा येथील सरपंच, उपसरपंच व नागरिक वेकाेलि कार्यालयात गेले हाेते. मात्र, येथील सुरक्षा रक्षकांसह अधिकाऱ्यांनी त्यांना असभ्य वागणूक दिली. तुम्ही ऑफीसमध्ये कसे आले, हे काेराेना उपाययाेजनांचे उल्लंघन आहे, असे धमकावत त्यांची कैफियतसुद्धा ऐकून घेतली नाही.

...

तो दगड आमचा नाही

घरावर आलेला दगड आमचा म्हणजेेच स्फाेटाचा नाही असे सांगत वेकाेलि अधिकाऱ्यांनी या नुकसानीची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांनी नुकसानीचा पंचनामाही केला नाही. त्यातच स्थानिकांनी शनिवारपासून पुन्हा आंदाेलन करण्याची तयार सुरू केली आहे.

...

आत जा, घरावर दगड येतील

स्फाेटापूर्वी एक सुरक्षा रक्षक तिथे तैनात हाेता. त्याला एक वृद्ध महिला घराबाहेर दिसताच त्याने तिला स्फाेटाचे दगड घरावर येण्याची व आत जाण्याची सूचना केली हाेती, अशी माहिती त्या वृद्धेने दिली. या सुरक्षा रक्षकाची सूचना विचारात घेता, वेकाेलि अधिक तीव्रतेचा स्फाेट घडवून आणणार असल्याचे स्पष्ट हाेते.