नागपुरात  शाळकरी मुलीसोबत शरिरसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:48 IST2019-08-03T23:47:27+5:302019-08-03T23:48:23+5:30

शाळकरी मुलीसोबत मैत्री करून तिला आपल्या घरी नेऊन एका अल्पवयीन आरोपीने तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडले. शुक्रवारी या प्रकाराचा वस्तीत बोभाटा झाल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.

Sex with schoolgirls in Nagpur | नागपुरात  शाळकरी मुलीसोबत शरिरसंबंध

नागपुरात  शाळकरी मुलीसोबत शरिरसंबंध

ठळक मुद्देअंबाझरीत गुन्हा दाखल : आरोपीची सुधारगृहात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळकरी मुलीसोबत मैत्री करून तिला आपल्या घरी नेऊन एका अल्पवयीन आरोपीने तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडले. शुक्रवारी या प्रकाराचा वस्तीत बोभाटा झाल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.
मुलगी १३ वर्षांची असून ती अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वस्तीत राहते. आरोपी १७ वर्षांचा आहे. दहावीनंतर त्याने शाळा सोडली. त्याने काही दिवसांपूर्वी मुलीसोबत मैत्री जोडली. त्यानंतर तो तिला इकडे तिकडे फिरायला नेऊ लागला. फिरून आल्यानंतर आरोपी तिला आपल्या घरी न्यायचा आणि तिच्यासोबत शरीरसंबंध जोडायचा. गेल्या महिनाभरात त्याने तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध जोडले. गुरुवारी त्याने अशाच प्रकारे तिला दिवसभर बाहेर फिरवले. त्यानंतर रात्रभर तो तिच्यासोबत राहिला. सकाळपासून घराबाहेर गेलेली मुलगी रात्र झाली तरी परत आली नाही. त्यामुळे तिचे पालक तिची शोधाशोध करीत होते. शुक्रवारी दुपारी ती घरी परत आली तेव्हा आईवडिलांनी तिची चांगलीच खबरबात घेतली. रात्रभर कुठे होती, अशी विचारणा केल्यानंतर मुलीने तिची प्रेमकथा पालकांना सांगितली. वस्तीत या दोघांच्या शरीरसंबंधाचा बोभाटा झाला. त्यामुळे मुलीच्या पालकांनी तिला सरळ पोलीस ठाण्यात नेले. तेथे मुलीने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीएसआय शेख यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याला बाल न्यायालयात हजर करून त्याची आज बाल सुधारगृहात रवानगी केली.

Web Title: Sex with schoolgirls in Nagpur