नागपुरमधील जरीपटक्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड

By योगेश पांडे | Updated: May 7, 2023 17:33 IST2023-05-07T17:32:15+5:302023-05-07T17:33:00+5:30

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

Sex racket busted in Jaripatka in Nagpur | नागपुरमधील जरीपटक्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड

नागपुरमधील जरीपटक्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड

नागपूर : जरीपटक्यातील हुडको कॉलनी येथील सेक्स रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

हुडको कॉलनी येथे फरीदा मोहम्मद खान (४३) नावाची महिला गरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. फरीदा हीच मुलींना ग्राहक व जागा उपलब्ध करून द्यायची. पोलिसांनी सापळा रचला व शनिवारी सायंकाळी एक डमी ग्राहक पाठविला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांच्या पथकाने फरीदाला सौदा करताना रंगेहाथ अटक केली. त्यावेळी तेथे एक अल्पवयीन मुलगी होती.

फरीदाची चौकशी केली असता तिने धनश्री उर्फ सोनी हिरामन वाघमारे (३५, कबीरनगर) या महिलेच्या माध्यमातून अल्पवयीन मुलगी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी सोनीलादेखील अटक केली. फरीदा व सोनीविरोधात पिटा तसेच पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, संतोष जाधव, अनिल अंबाडे, राशीद साजिद, भूषण झाडे, लक्ष्मण चैरे, मनीष रामटेके, सुधीर तिवारी, रिना जाऊळकर, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Sex racket busted in Jaripatka in Nagpur