शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून तिळाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST

नागपूर : राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातून नागपुरात तिळाची आवक वाढली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. किरकोळ बाजारात पांढरे ...

नागपूर : राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातून नागपुरात तिळाची आवक वाढली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. किरकोळ बाजारात पांढरे तीळ १२० ते १३० रुपये आणि लाल तीळ १५० ते १६० रुपये भाव आहेत. संक्रांतीच्या चार ते पाच दिवसांपूर्वी बाजारात गर्दी राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मकर संक्रांतीला सात दिवस उरले असून बाजारात पांढऱ्या आणि लाल तिळाची मागणी वाढत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी आहेत. गेल्यावर्षी पांढऱ्या तिळाचे भाव १४५ ते १८० रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे भाववाढ होऊ नये म्हणून महिला आतापासून खरेदी करत आहेत. दहा दिवसांपूर्वी नवीन तिळाची आवक फारच कमी असल्याने व्यापाऱ्यांनी जुन्या तिळाची विक्री सुरू केली होती. त्यामुळे १० ते २० रुपये किलो भाव वाढले होते. नवीन तिळाची आवक सुरू होताच भाव कमी झाल्याची माहिती इतवारीतील नीरव ट्रेडिंगचे संचालक अरविंद पटेल यांनी दिली.

पटेल म्हणाले, पांढऱ्या तिळाची विक्री संपूर्ण देशात होते. त्या तुलनेत लाल तिळाची विक्री केवळ महाराष्ट्रात मुख्यत्वे नागपुरात होते. त्यामुळे नागपुरात लाल तिळाचे दर पांढऱ्याच्या तुलनेत जास्त असतात. गेल्यावर्षी संक्रांतीच्या दोन दिवसांपूर्वी लाल तीळ १९० रुपयांवर पोहोचले होते. भारतात पांढऱ्या तिळाचे उत्पादन राजस्थान (उंझा), मध्य प्रदेश (ग्वालिअर) आणि लाल तीळ गुजरातमध्ये (राजकोट) जास्त प्रमाणात होते. देशांतर्गत तिळाची गरज ४.५ लाख मेट्रिक टन इतकी आहे. त्या तुलनेत उत्पादन कमी आहे.

मागणी वाढल्यास भाववाढ

गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले गुळाचे (लड्डू) भाव कमी झाले असून किरकोळमध्ये ४० रुपये किलो आहेत. कोल्हापुरी गूळ (केमिकलयुक्त) ५५ ते ६० रुपये आणि देशी गूळ (केमिकलरहित) ७५ रुपये किलो आहेत. यावर्षी गुळाचे शाॅर्टेज आहे. दरवर्षी या काळात राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातून होणारी गुळाची आवक कमी आहे. संक्रांतीत मागणी वाढल्यानंतर भाव वाढू शकतात.

- चंदू जैन, व्यापारी