विदेशी प्रजातीच्या श्वानांची चोरी करून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:17 AM2018-08-25T00:17:44+5:302018-08-25T00:19:44+5:30

मागणी असलेल्या विदेशी प्रजातीच्या श्वानांची चोरी करून दुसरीकडे विक्री केल्या जात असल्याची बाब समोर येत आहे. हे श्वान महागडे असल्याने एखाद्याकडचा पाळलेला कुत्रा चोरून तो कमी किमतीत विक्री केला जातो. दत्तक घेण्याच्या नावाने प्राणिमित्र संघटनांची दिशाभूल करूनही श्वानांची विक्री केली जाते. एका प्राणिमित्र संघटनेला आलेल्या अनुभवावरून ही धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा श्वान चोरीचा व्यवसाय करणाऱ्यांचे जाळे सक्रिय असल्याची शक्यता असून यामध्ये महाविद्यालयातील तरुणही गुंतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Selling extermination of exotic dog | विदेशी प्रजातीच्या श्वानांची चोरी करून विक्री

विदेशी प्रजातीच्या श्वानांची चोरी करून विक्री

Next
ठळक मुद्देप्राणिमित्र संघटनेचा धक्कादायक खुलासा : टोळी सक्रिय असल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : मागणी असलेल्या विदेशी प्रजातीच्या श्वानांची चोरी करून दुसरीकडे विक्री केल्या जात असल्याची बाब समोर येत आहे. हे श्वान महागडे असल्याने एखाद्याकडचा पाळलेला कुत्रा चोरून तो कमी किमतीत विक्री केला जातो. दत्तक घेण्याच्या नावाने प्राणिमित्र संघटनांची दिशाभूल करूनही श्वानांची विक्री केली जाते. एका प्राणिमित्र संघटनेला आलेल्या अनुभवावरून ही धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा श्वान चोरीचा व्यवसाय करणाऱ्यांचे जाळे सक्रिय असल्याची शक्यता असून यामध्ये महाविद्यालयातील तरुणही गुंतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जर्मन शेफर्ड, सेंट बर्नार्ड, लॅब्राडॉर, ग्रेड डेन, पग (व्होडाफोन) आदी श्वानांना शहरात विशेष मागणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रजातींच्या श्वानांचे पिल्लू ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत किमतीत खरेदी केले जाते. कुत्रे हे लवकर रुळणारे असल्याने कुटुंबातील सदस्यांना त्यांचा जिव्हाळाही लागतो. त्यामुळे शहरात हे विदेशी प्रजातींचे श्वान पाळणाºयांची संख्या अधिक आहे. चोरी करणाºयांकडून या मागणीचा फायदा घेतला जात आहे. शहरात बेवारस श्वान व इतर प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाºया सेव्ह स्पिचलेस आॅर्गनायझेशन या संस्थेच्या संस्थापिका स्मिता मिरे यांनी त्यांच्या सहकाºयांना आलेला धक्कादायक अनुभव लोकमतजवळ मांडला. मागील महिन्यात ८ जुलै रोजी हिंगणा रोडवरील मेट्रो रेल्वेच्या डेपोजवळ, लोकमान्यनगर येथे सेंट बर्नार्ड प्रजातीचा श्वान एका व्यक्तीच्या सांगण्यावरून संस्थेच्या सदस्यांना आढळून आला होता. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले होते. संस्थेने तेथीलच अथर्व आशिष अपार्टमेंटमध्ये त्याच्यावर औषधोपचार व जेवणाची व्यवस्था केली. संस्था या श्वानाचा मूळ मालक किंवा कुणाला तरी दत्तक देण्याची वाट पाहत होती. मात्र यादरम्यान नेमका हाच कुत्रा विकायचा असल्याचा एक संदेश संस्थेच्या एका सदस्याला व्हॉट्सअ‍ॅपवर प्राप्त झाला. त्यामुळे संशय निर्माण झाला. २१ जुलैला संस्थेच्या संकेत बाभळे यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा समोरच्या तरुणाने हा कुत्रा १५ हजारात विक्री करायचा असल्याचे सांगितले. या श्वानाची बाजारात जवळपास ५० हजार रुपये किंमत असल्याचे स्मिता यांनी सांगितले. संस्थेच्या सदस्यांनी सापळा रचून या तरुणाची सत्यता जाणून घेतली. हा तरुण महाविद्यालयात शिकत असून पोलीस कर्मचाºयाचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Selling extermination of exotic dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.