शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सदानंद देशमुख यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

By admin | Updated: December 26, 2015 03:43 IST

मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर या साहित्य संस्कृती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या ६५ व्या ..

६५ वे विदर्भ साहित्य संमेलन : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे चंद्रपूर येथे संमेलननागपूर : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर या साहित्य संस्कृती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. देशमुख यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील अमदापूर या खेड्यात झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यावर मराठी विषयात त्यांनी एम. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर आचार्य पदवी त्यांनी प्राप्त केली. कादंबरी, ललित साहित्य, कविता, कथालेखन आदी क्षेत्रात त्यांचा संचार असून त्यांच्या ‘बारोमास’ कादंबरीला साहित्य अकादमीचा वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला. या कादंबरीचा हिंदी, व इंग्रजी भाषेत अनुवादही झाला. त्यांना राज्य शासनाचे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. ना. आपटे पुरस्कार, मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पु. य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार, संस्मरणीय सकस लेखनाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार, यशवंतराव दाते संस्थेचा सहकार व शिक्षण महर्षी बाबूराव देशमुख पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भंवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगावच्या निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे. सोलापूरच्या सुशील फोरमने सुशीलकुमार शिंदे साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या साहित्यावर संशोधनही करण्यात आले आहे. बारोमास ही कादंबरी, खुंदळघास, गाभुळगाभा, रगडा, लचांड, उठावण, महालूट के कथासंग्रह, गावकळा हा कवितासंग्रह, भुई रिंगणी हे ललितगद्य ही त्यांची वाङ्मय संपदा आहे. ‘बळ घेऊन भुईच’ व ‘जमीनजुमला’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पुणे विद्यापीठात विशेष ग्रंथकार म्हणून त्यांची पुस्तके पदव्युत्तर पदवीसाठी अभ्यासक्रमात आहेत. डॉ. सदानंद देशमुख यांच्या निवडीचे साहित्य क्षेत्रात स्वागत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)