नागपुरातील बजेरिया नागेश्वर मंदिर परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:21 IST2020-05-22T23:19:06+5:302020-05-22T23:21:32+5:30
महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील प्रभाग क्रमांक १९ मधील बजेरिया नागेश्वर मंदिर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश शुक्रवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

नागपुरातील बजेरिया नागेश्वर मंदिर परिसर सील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील प्रभाग क्रमांक १९ मधील बजेरिया नागेश्वर मंदिर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश शुक्रवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
घोषित प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पूर्वेस- गणेश मंदिर
उत्तरपश्चिमेस - ननुमल बिल्डिंग
दक्षिण-पश्चिमेस- शीतला माता मंदिर
दक्षिण पूर्वेस-एम्प्रेस मिल भिंत