शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

उंदरांमुळे पसरतोय स्क्रब टायफस : पशुवैद्यकीय तज्ज्ञाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 21:26 IST

या वर्षी विदर्भात मोठ्या प्रमाणावर  झालेला पाऊस, यामुळे जमिनीखालील उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, परिणामी बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या रक्तावर वाढत असलेले स्क्रब टायफसचे ‘चिगर माईट्स’ हे उंच गवतात, दाट झाडीत पसरत असल्याने आणि त्यांच्या संपर्कात व्यक्ती येत असल्याने या वर्षी ‘स्क्रब टायफस’ वाढला असावा, अशी शक्यता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप चौधरी व डॉ. एस. डब्ल्यू. कोलते यांनी वर्तवली आहे.

ठळक मुद्देपाऊस कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : या वर्षी विदर्भात मोठ्या प्रमाणावर  झालेला पाऊस, यामुळे जमिनीखालील उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, परिणामी बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या रक्तावर वाढत असलेले स्क्रब टायफसचे ‘चिगर माईट्स’ हे उंच गवतात, दाट झाडीत पसरत असल्याने आणि त्यांच्या संपर्कात व्यक्ती येत असल्याने या वर्षी ‘स्क्रब टायफस’ वाढला असावा, अशी शक्यता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप चौधरी व डॉ. एस. डब्ल्यू. कोलते यांनी वर्तवली आहे.डॉ. चौधरी म्हणाले, दरवर्षी ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळून येतात परंतु यांची संख्या फार कमी राहत असल्याने याकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते. २०१२ मध्ये चर्चेला आलेला हा रोग २०१८ मध्ये का वाढला या बाबत सामूहिक संशोधन होणे आवश्यक आहे. ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरिएन्शिया सुतसुगामुशी’ नामक जीवाणूमुळे (बॅक्टेरिया) होतो. हे बॅक्टेरीया विशेषत: उंदरांच्या रक्तावर पोसले जातात. यामुळे या आजाराचे वाहक म्हणून उंदरांकडे पाहिले जाते.डॉ. कोलते म्हणाले, स्क्रब टायफस हा साधारण आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिसून यायचा. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पावसाचे पाणी जमिनीखाली असलेल्या उंदरांच्या बिळात शिरले. हे उंदीर बिळाबाहेर येऊन उंच गवतात, झाडांच्या मुळाखाली, घरात आले. त्यांच्या शरीरावर असलेले बॅक्टरीया म्हणजे ‘चिगर माईट्स’ ज्याचा आकार अतिशय सुक्ष्म ०.२ ते ०.४ मिलिमीटर एवढा असतो, जे सर्वसाधारण नजरेसही पडत नाही, असे हे जीवाणू एखादा व्यक्ती गवतात, झुडूपात गेल्यास त्याच्या त्वचेवर चिकटून बसतात. साधारण तीन दिवसानंतर ते खाली पडतात. त्या ठिकाणी व्रण दिसतो. ज्याला ‘इशर’ म्हणतात. हा ‘इशर’ या आजाराची ओळख आहे. परंतु ४० टक्के लोकांमध्ये याची लक्षणे दिसून येतातच असे नाही. असे हे बाधित जीवाणू पुढे प्रौढ होऊन उंदरांच्या बिळामध्ये अंडी देतात आणि अशी त्यांची ‘सायकल’ सुरू असते.‘चिगर माईट्स’ मिळविण्यासाठी प्रयत्नडॉ. चौधरी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ‘चिगर माईट्स’ मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. काही उंदरांना पकडून महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आणून तसा प्रयत्नही झाला, परंतु माईट्स आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे, एखाद्या घरात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळून आल्यावर त्याच्या बाजूचा घरात किंवा त्याच घरातील कुटुंबात रुग्ण आढळून आलेले नाही. यामुळे याच्यावर आणखी अभ्यास होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य