‘स्क्रब टायफस’कडे २०१२ पासूनच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:54 AM2018-09-01T11:54:23+5:302018-09-01T11:54:55+5:30

विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.

Scrab typhus ignored since 2012 | ‘स्क्रब टायफस’कडे २०१२ पासूनच दुर्लक्ष

‘स्क्रब टायफस’कडे २०१२ पासूनच दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देसहा वर्षानंतरही तपासणीच्या सोर्इंचा अभाव

आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. या रोगाने अनेक लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. काहींचा मृत्यूही झाला आहे. जर राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.
‘स्क्रब टायफस’चे पहिले प्रकरण आॅक्टोबर २०१२ मध्ये समोर आले. काटोल येथील कोलू गावातील कुसुम वानखेडे या महिलेला हा रोग झाला
होता. उपचारानंतर ही महिला बरी झाली होती. परंतु त्या नंतर या रोगाला घेऊन सामान्यांना माहिती देण्यासाठी जनजागृतीच झाली नाही. धक्कादायक म्हणाजे, स्क्रब टायफसच्या निदानासाठी आवश्यक ‘पीसीआर’सह आणखी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी, सहा वर्षांत या रोगाचा प्रकोप वाढला. सूत्रानुसार, यापूर्वीही या रोगाचे रुग्ण आढळून येत होते, काहींचा मृत्यूही झाला. परंतु प्रकरण समोर आले नसल्याने उपाययोजनाही झाल्या नाहीत. ‘लोकमत’ने पहिल्यांदा हे प्रकरण समोर आणल्याने उपाययोजनांना आता कुठे सुरूवात झाली.

कोमामध्ये होती कुसुम
८ आॅक्टोबर २०१२ रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गंभीर अवस्थेत कुसुम वानखेडे यांना उपचारासाठी आणले. त्या कोमात होत्या. उपचारादरम्यान त्यांचे रक्त नमूने घेऊन डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर व व्हायरल तापाची तपासणी करण्यात आली. परंतु या रोगाचे लक्षण दिसून आले नव्हते. नंतर मेयोच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत जोशी यांनी उपचारादरम्यान कुसुमच्या छातीवर एक व्रण दिसला. त्यावरून ‘स्क्रब टायफस’ची शंका निर्माण झाली. नंतर रक्ताचे नमूने दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पाठविण्यात आले. १९ आॅक्टोबर २०१२ रोजी आलेल्या अहवालात ‘स्क्रब टायफस’ असल्याचे निदान झाले.

२०१२ मध्ये प्रसिद्ध केले होते वृत्त
‘स्क्रब टायफस’चे निदान झाल्यानंतर २३ आॅक्टोबर २०१२ रोजी ‘लोकमत’ने ‘गवतावर संभाळून चला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून रोगाची माहिती दिली होती. त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले होते, उपचाराच्या सोई उपलब्ध करून दिल्या जात आहेत, रोगाला घेऊन जागरुक केले जात आहे.

 

 

Web Title: Scrab typhus ignored since 2012

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य