शालार्थ आयडी घोटाळा : मुख्याध्यापकाविरोधात तक्रार करणारा संस्थाचालकच अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:32 IST2025-06-25T14:31:38+5:302025-06-25T14:32:47+5:30

Nagpur : एसआयटीच्या चौकशीत अडकला, ४८ शिक्षकांचा बनावट शालार्थ आयडी

School ID scam: The director of the institution who filed a complaint against the principal has been arrested | शालार्थ आयडी घोटाळा : मुख्याध्यापकाविरोधात तक्रार करणारा संस्थाचालकच अटकेत

School ID scam: The director of the institution who filed a complaint against the principal has been arrested

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटीला आणखी एक यश मिळाले आहे. तब्बल ४८ शिक्षकांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार करणाऱ्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित संस्थाचालकाने त्याच्या शिक्षण संस्थेचे बनावट लेटरहेड वापरून अपात्र मुख्याध्यापक पराग पुडकेने पद मिळविल्याची तक्रार केली होती. आता त्याच्यावरच हे प्रकरण उलटले असून, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


ओंकार भाऊराव अंजीकर (वय ४६, बाळाभाऊपेठ) असे अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचे नाव आहे. अंजीकरची शांतिनिकेतन शैक्षणिक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत गुलशननगर येथील जय हिंद विद्यालय, एस.के.बी. हायस्कूल यांच्यासह तीन शाळा चालविल्या जातात. २०१९ पासून अंजीकरा यांनी सुमारे ३० शिक्षकांचे शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. त्यासाठी त्याने शिक्षकांकडून (पान १ वरुन) पैसे घेतले. नंतर, प्रत्येक

शिक्षकाकडून त्यांचे थकीत वेतन मिळावे यासाठी १० लाख रुपयेही घेतले. वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे याच्या मदतीने अंजीकरने बनावट शालार्थ आयडी तयार केले. जेव्हा सायबर पोलिसांनी बनावट आयडींची चौकशी सुरू केली तेव्हा अंजीकरच्या शाळेत हे ३० व अगोदरचे १८ असे ४८ बनावट शालार्थ आयडी तयार झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी सापळा रचून सोमवारी रात्री अंजीकरला केली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंजीकर हा या घोटाळ्यात अटक झालेला चौथा शाळा संचालक आहे. याअगोदर चरण चेटुले, राजू मेश्राम व दिलीप धोटे या तिघांना अटक करण्यात आली होती.


पराग पुडकेविरोधात अंजीकरने केली होती तक्रार
अपात्र असूनदेखील बनावट दस्तऐवजांचा वापर करून मुख्याध्यापक पद मिळविणाऱ्या पराग पुडकेला एप्रिल महिन्यात सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली होती. त्याची ओंकार अंजीकरनेच सर्वात अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती. पुडकेने अंजीकरच्याच एस. के. बी. हायस्कूल येथे १ ऑगस्ट २०१७ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत कार्यरत असल्याचे अनुभव प्रमाणपत्रदेखील तयार करून दिले होते. त्यावर मुख्याध्यापिकेची बोगस स्वाक्षरीदेखील होती. अंजीकरने ऑगस्ट २०२३ मध्येच उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती. आता शिक्षणक्षेत्राशी निगडित दुसऱ्या मोठ्चा घोटाळ्यात स्वतः अंजीकर अडकल्याने आणखी मोठ्या लिंक समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: School ID scam: The director of the institution who filed a complaint against the principal has been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर