शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक क्रांतिचा वसा घेतलेला अभ्यासू व वैचारिक सहकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST

माझ्या सार्वजनिक जीवनातील अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे सहकारी असलेले ॲड. एकनाथ साळवे यांचे निधन झाल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. ...

माझ्या सार्वजनिक जीवनातील अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे सहकारी असलेले ॲड. एकनाथ साळवे यांचे निधन झाल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. एकनाथ साळवेंना सुमारे ११ वर्षे विधिमंडळ सदस्य म्हणून अगदी जवळून पाहता आले. तदनंतरही त्यांची साथ आणि स्नेह सतत लाभला. देशात सामाजिक ऐक्य असावे, लोकशाहीची फळे समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचावीत यासाठी परिवर्तनाचे आंदोलन उभारले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्यशोधक किसान मंचाच्या माध्यमातून ते रचनात्मक संघर्ष करीत राहिले. ते एक अतिशय विनम्र , स्वच्छ प्रतिमा असलेले पुरोगामी व प्रतिभावान सामाजिक नेते हाेते. सामाजिक क्रांतीचा वसा घेतलेला विदर्भातील एक अभ्यासू आणि वैचारिक सहकारी गमावल्याचे दु:ख मला होत आहे. सामाजिक क्रांतीचा वसा घेतलेला विदर्भातील एक अभ्यासू आणि वैचारिक सहकारी गमावल्याचे दु:ख होत आहे.

-शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

--------------

महात्मा गांधी यांच्या विचारांवर अढळ श्रद्धा असलेले नेतृत्व

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. एकनाथराव साळवे यांच्या निधनामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर अढळ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

-बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

---------------------

विदर्भातील चळवळीचा नेता गमावला

ज्येष्ठ गांधीवादी व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. एकनाथराव साळवे यांचे निधन विदर्भासाठी मोठा आघात आहे. विदर्भातील विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील एक चळवळीचा नेता आमच्यातून निघून गेला. त्यांचे गांधीवादी विचार सदैव आठवणीत राहतील.

-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसपुरोगामी विचारांचा अग्रणी योद्धा गमावला

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेला व त्या विचारांना स्वतः आचरणात आणणारा पुरोगामी विचाराचा अग्रणी योद्धा अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांच्या रूपाने गमावला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव होता की, त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेस परिवाराचेच नुकसान झाले नाही तर पुरोगामी विचारांना आचरणात आणणारा एक अग्रणी योद्धा आम्ही गमावला आहे.

-नितीन राऊत,ऊर्जामंत्री