शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

नागपूर विभागात पाण्याची भीषणता आणखी तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:38 IST

संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देधरणांमध्ये केवळ सहा टक्के पाणी साठा : पाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीतोतलाडोह, नांद वणा, दिना, पोथरा, गोसीखुर्द, बावनथडी प्रकल्प रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गोसीखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा आणि बावनथडी यासारखे मोठे प्रकल्प तर रिकामे आहेत. या धरणात केवळ ० टक्के इतका साठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला ( १६ मे रोजी) केवळ २२२ दलघमी(६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३६ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये ९ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १५ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १८ टक्के, सिरपूर २० टक्के, पुजारी टोला १० टक्के, कालीसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ६ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३० टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये ६ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ५ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष       (१६ मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा२०१९- २२२ दलघमी२०१८ - ८०६ दलघमी२०१७ - ४०१ दलघमी२०१६ - ७८५ दलघमी२०१५- ८४३ दलघमी२०१४ - १५४६ दलघमीमध्यम व लघु प्रकल्पातील साठाही होतोय कमीनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात १६ मे रोजीपर्यंत केवळ ७२ दलघमी म्हणजेच १३ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४८ दलघमी म्हणजेच १० टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

 

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई