'एसबीएल' स्फोट, आणखी एका महिलेचा गेला जीव; बळींची संख्या २५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:20 IST2026-03-16T17:20:09+5:302026-03-16T17:20:39+5:30

Nagpur : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल' कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणातील मृतांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाहीये.

'SBL' blast, another woman dies; death toll rises to 25 | 'एसबीएल' स्फोट, आणखी एका महिलेचा गेला जीव; बळींची संख्या २५ वर

'SBL' blast, another woman dies; death toll rises to 25

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल' कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणातील मृतांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाहीये. या औद्योगिक दुर्घटनेतील बळींची संख्या आता तब्बल २५ वर पोहोचली आहे. नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या ज्योती शामू धुर्वे (२१) या तरुणीने आज, रविवारी सकाळी ९:४५ वाजता अखेरचा श्वास घेतला.

ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान यापूर्वी सुजाता रक्षित (७० टक्के जळालेल्या), सीमा धुर्वे (७० टक्के), रोशनी उमाटे (७५ टक्के), आम्रपाली कळसरपे (५५ टक्के), दुर्गा सेवतकर (६० टक्के) आणि रंजना घागरे (३० टक्के) या महिलांचा मृत्यू झाला होता. यात आता ६५ टक्के जळालेल्या ज्योती धुर्वेची भर पडली आहे. तिच्यावर बायपॅप सपोर्टवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. १३ मार्चला तिच्या जखमांवर सातव्यांदा 'डिब्राइडमेंट' आणि ड्रेसिंग करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही तिची प्राणज्योत मालवली. स्फोटाच्या दिवशी अत्यंत भीषण अवस्थेत एकूण १९ गंभीर रुग्णांना तत्काळ ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचाराला १५ दिवस होऊनही आयसीयूमध्ये उपचाराखाली 

Web Title : 'एसबीएल' विस्फोट: एक और महिला की मौत, अब मृतकों की संख्या 25 हुई

Web Summary : राउलगोन स्थित 'एसबीएल' कंपनी में हुए विस्फोट में मरने वालों की संख्या 25 तक पहुंची। ज्योति धुर्वे (21) ने नागपुर के ऑरेंज सिटी अस्पताल में रविवार को दम तोड़ दिया। वह 1 मार्च के विस्फोट के बाद से गंभीर रूप से झुलस गई थी।

Web Title : 'SBL' Blast Death Toll Rises: Another Woman Dies, Now 25

Web Summary : The death toll in the Raoulgaon 'SBL' company blast has reached 25. Jyoti Dhurve, 21, succumbed to her injuries at Orange City Hospital in Nagpur on Sunday. She had been battling severe burns since the March 1st explosion.