शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

से नो टू ‘नायलॉन’ मांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:59 IST

‘नायलॉन’ मांजाने पतंग उडवून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्या पतंगबाजांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यानंतरच त्यांच्यावर वचक येईल.

ठळक मुद्देजनमानसाची प्रतिक्रिया कारवाईमुळेच पतंगबाजांवर वचक येईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नायलॉन’ मांजाने पतंग उडवून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्या पतंगबाजांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यानंतरच त्यांच्यावर वचक येईल. त्याकरिता प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी कारवाई करण्याची हिंमत दाखविण्याची वेळ आली आहे अशी मागणी जनतेद्वारे करण्यात येत आहे.संक्रांतीच्या काळात ‘नायलॉन’ मांज्यामुळे जीव गेल्याच्या घटना नागपुरात घडल्या आहेत. शिवाय दरवर्षी अनेक लोक, प्राणी, पक्षी या मांज्यामुळे जखमी होतात.‘नायलॉन’च्या मांजाने पतंग उडवल्यामुळे धोका आहे हे माहिती असूनदेखील नागरिक तोच मांजा विकत घेतात.या मांज्याच्या विक्रीवर व वापरण्यावर बंदी आहे. मात्र असे असतानादेखील शहरात या मांज्याची विक्री व उपयोग सर्रासपणे सुरू आहे. विक्रेत्यांनी आपल्या विक्रीचा ‘पॅटर्न’ बदलला आहे, मात्र मांजा सहजपणे उपलब्ध आहे. जुनी शुक्रवारी, इतवारी, सक्करदरा, उत्तर नागपूर, धरमपेठ, गोपालनगर यासारख्या काही भागात ‘नायलॉन’ मांज्याची विक्री सुरू आहे. अशा स्थितीत प्रशासनाने कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असा सूर उमटत आहे.

सोशल नेटवर्किंग साईट्सवर जनजागृतीदरम्यान, ‘नायलॉन’च्या मांज्यामुळे होणाऱ्या धोक्यांबाबत ‘सोशल नेटवर्किंग साईट्स’वर प्रतिक्रिया उमटत आहे. स्वत:च्या बेजबाबदारपणामुळे दुसऱ्यांना मरणाच्या दारात ढकलणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल करायला हवा अशी भावना ‘नेटीझन्स’ने व्यक्त केली. अनेकांनी तर फेसबुक, टष्ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मांज्यांमुळे दुचाकी चालविताना मनात किती दहशत असते किंवा अपघात कसा पाहिला याचे वर्णनच केले. अनेकांनी ‘नायलॉन’ मांजा न वापरण्याचा ‘आॅनलाईन’ संकल्पदेखील केल्याचे दिसून आले.

नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखावीत्यामुळे असा दिखावा होणार असेल तर ओरड करण्यात काहीच अर्थ नाही. जर या ‘मांजा’सुरापासून सुटका हवी असेल तर नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून वागायला हवे. पतंग उडविणे काहीच गैर नाही, परंतु त्यासाठी पारंपारिक व कुठलाही धोका नसलेला मांजा वापरणे कधीही चांगले. नागरिकांनी स्वत:हूनच हा मांजा घेणार नाही असा संकल्प करायला हवा असे मत हितेश डोर्लीकर या तरुणाने व्यक्त केले.

स्वयंसेवी संघटनांतर्फे जनजागृतीमकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशन’ या स्वयंसेवी संघटनेतर्फे ‘नायलॉन’ मांजासंदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीदेखील सहभागी झाले होते. नागरिकांनी ‘नायलॉन’ मांजा वापरू नका असे आवाहन यावेळी संविधान चौक येथे करण्यात आले. पतंग कापण्यासाठी कुणाचा गळा कापल्या जाणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. काही वेळासाठी लोकांचा खेळ होतो, मात्र यामुळे दरवर्षी शेकडो पक्षी जखमी होतात व अनेकांचा बळीदेखील जातो. याबाबत तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत संघटनेच्या संस्थापिका व अध्यक्ष स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक