दारूगोळा, डिटोनेटर, स्फोटकांमुळे सत्यनारायण नुवाल झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 07:18 IST2025-07-03T07:11:49+5:302025-07-03T07:18:31+5:30

निव्वळ संपत्तीत नुवाल यांनी मुकेश अंबानी, गौतम अदानी यांनाही टाकले मागे

Satyanarayan Nuwal became rich due to ammunition, detonators, explosives | दारूगोळा, डिटोनेटर, स्फोटकांमुळे सत्यनारायण नुवाल झाले मालामाल

दारूगोळा, डिटोनेटर, स्फोटकांमुळे सत्यनारायण नुवाल झाले मालामाल

नागपूर : २०२५च्या पहिल्या सहामाहीत बाजारात प्रचंड अस्थिरता असूनही, अनेक भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. भू-राजकीय तणाव असताना सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी निव्वळ संपत्ती मिळविण्यात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनाही मागे टाकले आहे. नुवाल  यांची कंपनी दारूगोळा, डिटोनेटर, स्फोटके बनवते.

समूहाचा नागपूरजवळ एक आणि इतर देशांमध्ये आठ स्फोटके प्रकल्प आहेत. २०२५-२६ मध्ये, झिम्बाब्वे आणि कझाकिस्तानमध्ये दोन नवीन प्रकल्प सुरू करणार आहेत. सोलारने १० वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारसोबत संरक्षण उपकरणे निर्मितीमध्ये १२,७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. यातील मोठा वाटा नागपुरात गुंतवला जाईल. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल.

वर्षभरात कोण किती श्रीमंत झाले?

उद्योगपती      निव्वळ संपत्ती   वाढ (टक्केवारीत)

सत्यनारायण नुवाल      ७.९           ७८.४%

सुनील मित्तल    ३०.४          २७.३%

लक्ष्मी मित्तल    २४.८          २६.१%

राहुल भाटिया    १०.८          २४.९%

मुकेश अंबानी    ११०.५         २१.९%

राधाकिशन दमानी       १९.८          २१.१%

बेनू बांगुर       ८.५           २०.५%

उदय कोटक     १६.८          २०.१%

विक्रम लाल     १०.२          १६.०१%

नुस्ली वाडिया    १०.८          १५.९%

राकेश गंगवाल   ७.७           १४.५%

कुमार बिर्ला     २१.१          ११.४%

मुरली डिव्ही     ११.२          ९.४%

गौतम अदानी    ८५.४          ८.५%

सायरल पूनावाला १६                -३.७%

शिव नाडर      ४०.४           -६.४%

शापूर मिस्त्री     ३५.५          -७.९%

अझीम प्रेमजी    २८.५          -७.९%

दिलीप सांघवी   २६.४      -१०.३%

रवी जयपुरिया   १३              -२४.६%

नुवाल राहिले प्रथम स्थानी

सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्या संपत्तीत चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत प्रचंड वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती ७८ टक्क्यांहून अधिक वाढून ७.९० अब्ज डॉलर्स झाली. नागपूरमध्ये मुख्यालय असलेले सोलर इंडस्ट्रीज स्फोटके, डिटोनेटर, ड्रोन आणि दारूगोळा तयार करते. २०२४ मध्ये ४५ टक्के आणि २०२३ मध्ये ५४ टक्के वाढीनंतर, २०२५ मध्ये कंपनीचा स्टॉक ८१ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Satyanarayan Nuwal became rich due to ammunition, detonators, explosives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.