शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी वसुलीसाठी संजय खापेकरची हत्या

By admin | Updated: April 20, 2016 02:56 IST

खंडणी वसुलीत अडसर ठरल्यामुळे पाच गुंडांनी संजय शामराव खापेकर (वय ३४, रा. तांडापेठ) याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

नागपूर : खंडणी वसुलीत अडसर ठरल्यामुळे पाच गुंडांनी संजय शामराव खापेकर (वय ३४, रा. तांडापेठ) याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. राधे ऊर्फ राधेश्याम शिवदास खोब्रागडे (रा. गड्डीगोदाम), भुऱ्या ऊर्फ शुभम विनायक बोणेकर (वय १९, रा. तांडापेठ) असे चारमधील दोन आरोपींची नावे आहेत. एक आरोपी अनोळखी असून, एक अल्पवयीन आहे. आरोपी राधे कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, तो तांडापेठमधील कपड्याचे व्यापारी तसेच कारागिरांना धमकावून खंडणी वसूल करीत होता. संजय ज्या कारखानदाराकडे सलवार सूटच्या प्रेसचे काम करायचा तेथे येऊन राधे आणि त्याच्या साथीदारांनी काही दिवसांपूर्वी खंडणीची मागणी केली होती. संजयने तीव्र विरोध करून कारखानदाराला खंडणी देण्यापासून रोखले होते. त्यामुळे राधे आणि त्याचे साथीदार चिडून होते. संजय खंडणी वसुलीच्या आड येत असल्यामुळे आरोपींनी त्याला अनेकदा शिवीगाळ करून मध्ये येऊ नको, असा दमही दिला होता. मात्र, स्वाभिमानी संजय राधे आणि त्याच्या गुंडांच्या धमक्यांना भीक घालत नव्हता. या पार्श्वभूमीवर, अल्पवयीन आरोपी आणि राधे काही दिवसांपासून संजयच्या मागे लागले होते. सोमवारी रात्री ९.४० ला संजयला पुन्हा शिवीगाळ करून आमच्या आडवे आला तर चांगले होणार नाही, अशी धमकी दिली. संजयनेही त्यांना या भागात खंडणी मागितल्यास परिणाम गंभीर होतील, असे म्हटले. त्यामुळे आरोपींनी संजयला मारहाण केली तर राधेने चाकूचे घाव घालून संजयला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. वर्दळीच्या ठिकाणी हा थरार घडल्यानंतर आजूबाजूच्यांनी संजयला उपचाराकरिता मेयोत नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. संजयचा भाऊ दिलीप शामराव खापेकर (वय ३२) यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.(प्रतिनिधी)परिसरात तणाव परिसरात जिगरबाज म्हणून संजय ओळखला जायचा. तो वस्तीतील नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असायचा. त्यामुळे त्याच्या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. संजयच्या वृद्ध माता-पित्यांना तसेच भावाला जबर मानसिक धक्का बसला असून, परिसरातील नागरिकांचाही आधार गेला आहे. त्याची हत्या करणारा अल्पवयीन आरोपी नेतागिरी करणाऱ्याचा मुलगा आहे. संजयच्या हत्येनंतर आरोपींना पाठीशी घालण्यासाठी आणि त्यांना मदत पुरविण्यासाठी पाचपावलीतील अनेक जण धावपळ करीत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.