शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

संजय ढोबळे यांचा अनोखा विक्रम  : वर्षभरात मिळाले १९ पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:05 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.संजय जानराव ढोबळे यांच्या नावे एक अ़नोखा विक्रम नोंदविल्या गेला आहे.

ठळक मुद्देजगभरात नामांकित ‘जर्नल’मध्ये शोधपत्रिका प्रकाशित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.संजय जानराव ढोबळे यांच्या नावे एक अ़नोखा विक्रम नोंदविल्या गेला आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘प्रोग्रेस इन मटेरिअल सायन्स’ या ‘जर्नल’मध्ये शोधपत्रिका प्रकाशित झाली आहे. ‘न्यू रिव्हू ऑन द अ‍ॅडव्हान्समेंट इन फॉस्फर कनव्हरटेट लाईट इमिटींग डायोड : फॉस्फर सिंन्थेसिस, डिव्हाईस फेब्रिकेशन अ‍ॅन्ड कॅरेक्टाईझेशन’ या विषयावर त्यांची संशोधन पत्रिका आहे. विशेष म्हणजे संबंधित ‘जर्नल’चा ‘इम्पॅक्ट फॅक्टर’ हा २३.७२५ इतका आहे.ढोबळे यांनी २०१९ या एका वर्षात १४ पेटंट प्रकाशित केले आहे. यात त्यांना डॉ.किशोर रेवतकर, डॉ.निरुपमा ढोबळे, डॉ.अभय देशमुख, डॉ.अनुप भट, डॉ. थेजो कल्याणी, डॉ.गोविंद नायर, यातीश परोह, अभितीत कदम, मनोहर मेहरे, चैताली मेहरे, स्वाती जोशी, वैशाली पिंपळे, अखिलेश उगले व डॉ.अर्चना देशपांडे यांचे मौलिक सहकार्य लाभले. याशिवाय ‘जॉन वॅली अ‍ॅन्ड सन्स’ द्वारा प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘जर्नल’मध्ये त्यांचे १०० शोधनिबंध प्रकाशित झाले आहे. एकाच आंतरराष्ट्रीय नियतकालिकात शंभरी गाठणारे ते एकमेव संशोधक आहे. डॉ.ढोबळे यांच्या या उपलब्धीसाठी कुलगुरू डॉ.सिध्दीविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ.नीरज खटी, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ.जी.एस.खडेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :ResearchसंशोधनRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ