शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

संजय बर्वेंनी अजित पवारांची सिंचन घोटाळ्यातील भूमिका तपासली होती : हायकोर्टात सुधारित प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 8:02 PM

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये असलेली भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक संजय बर्वे यांनी तपासली होती

ठळक मुद्देपरमवीर सिंग यांची चूक दुरुस्ती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये असलेली भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक संजय बर्वे यांनी तपासली होती, असे स्पष्टीकरण वर्तमान महासंचालक परमवीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिले आहे. त्यांनी यासंदर्भात मंगळवारी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले.संजय बर्वे यांनी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेन्ट रुल्स ऑफ बिझनेस अ‍ॅन्ड इन्स्ट्रक्शन्समधील नियम १० अनुसार अजित पवार हे सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. संबंधित मंत्री त्यांच्या विभागातील सर्व बाबींसाठी जबाबदार असतात. पवार हे जल संसाधन मंत्री असताना विदर्भ व कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गतच्या विविध सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. मोबिलायझेशन अ‍ॅडव्हान्स व अन्य काही वादग्रस्त मंजुरींच्या नोटशिटस्वर पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत असेही त्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. एवढेच नाही तर, बर्वे यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचा २६ मार्च २०१८ रोजीचा अहवालही तपासला होता. एसीबीने अजित पवार यांच्या भूमिकेविषयी विचारेल्या उत्तरात तो अहवाल देण्यात आला होता. त्यात विदर्भ पाटबंधारे विकास कायद्यातील कलम २५ मधील तरतुदीची माहिती आहे. या कलमांतर्गत राज्य सरकार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला आवश्यक निर्देश देऊ शकते. बर्वे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात महामंडळाचे हे उत्तर एसीबीच्या प्रश्नाला सुसंगत नाही असे म्हटले होते. असे असताना परमवीर सिंग यांनी त्यांच्या २० डिसेंबर रोजीच्या प्रतिज्ञापत्रात बर्वे यांनी महामंडळाचा २६ मार्च २०१८ रोजीचा अहवाल विचारात घेतला नाही अशी माहिती दिली होती. ती चूक परमवीर सिंग यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्राद्वारे दुरुस्त केली आहे. बर्वे यांनी संबंधित अहवाल तपासला होता, पण त्यातील माहितीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नाही असे सिंग यांनी आता स्पष्ट केले. परमवीर सिंग यांनी त्यांच्या मूळ प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAjit Pawarअजित पवारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पCorruptionभ्रष्टाचारSanjay Barveसंजय बर्वे