लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वासू यांचे सहकारी भाजप नेते व विधान परिषद आमदार संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या राजकीय संन्यासाच्या निर्णयावर अखेर पुनर्विचार करत यू-टर्न घेतला आहे. विधान परिषदेतील आमदारकीची मुदत मे महिन्यात संपल्यानंतर सहा महिन्यांचा विश्रांती कालावधी घेऊन पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची माहिती त्यांनी शुक्रवारी दिली. या निर्णयामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
प्रेस क्लब येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी अचानक राजकीय संन्यासाची घोषणा केल्यानंतर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटल्या. संदीप जोशी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संवाद साधत मला निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. याशिवाय पक्षातील कार्यकर्त्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर भावनिक प्रतिसाद मिळाला. सगळ्यांनीच मला राजकारणापासून दूर जाऊ नये, अशी सातत्याने विनंती केली, असे जोशी यांनी सांगितले.
Web Summary : BJP leader Sandeep Joshi retracts his political retirement decision after advice from Fadnavis, Gadkari, and party workers. He will resume active politics after a six-month break following his legislative council term ending in May, sparking Nagpur political discussions.
Web Summary : भाजपा नेता संदीप जोशी ने फडणवीस और गडकरी की सलाह के बाद राजनीतिक संन्यास का फैसला वापस लिया। वह मई में विधान परिषद का कार्यकाल समाप्त होने के बाद छह महीने के अंतराल के बाद सक्रिय राजनीति में लौटेंगे, जिससे नागपुर में राजनीतिक चर्चा शुरू हो गई है।