ट्रकचालकात संचारला तारासिंग, चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या आरोपीला पकडले

By योगेश पांडे | Updated: August 30, 2023 16:30 IST2023-08-30T15:58:00+5:302023-08-30T16:30:12+5:30

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Sancharla Tarasingh, the truck driver, the accused who robbed at knifepoint was caught | ट्रकचालकात संचारला तारासिंग, चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या आरोपीला पकडले

ट्रकचालकात संचारला तारासिंग, चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या आरोपीला पकडले

नागपूर : चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱया एका आरोपीला ट्रकचालकाच्या हिंमतीमुळे पकडण्यात यश आले. ट्रकचालकाने चाकूची भिती न बाळगता आरोपीला पकडले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मंगळवारी कळमन्यातील एनआयटी कॉम्प्लेक्समधील एका दुकानात मो.सलमान मो.साजीद खान (३४, हसनबाग) हा ट्रकचालक ट्रक घेऊन उभा होता. तो काही वेळासाठी काही अंतरावर गेला असता आरोपी नवनीत भोजराज महल्ले (२८, कळमना) हा तेथे आला व क्लिनर चांदबाबू याला चाकूचा धाक दाखवून पैसे मागितले. पैसे चालकाजवळ असल्याचे चांदबाबूने सांगितल्यावर आरोपीने त्याला फोन करून बोलविण्यास सांगितले.

सलमान तेथे पोहोचला असता नवनीतने त्यालादेखील चाकूचा धाक दाखविला व खिशातील पैसे हिसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र सलमानने हिंमत दाखवून नवनीतचा हात पकडला व त्यानंतर चाकू खाली पाडून त्याला क्लिनरच्या मदतीने पकडले. परिसरातील नागरिकांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. कळमना पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी पोहोचले व आरोपीला अटक केली. पोलिसांनी नवनीतविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sancharla Tarasingh, the truck driver, the accused who robbed at knifepoint was caught