ज्या नदीकिनारी फिरायला गेली, तिथेच फेकला सना खानचा मृतदेह; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 19:35 IST2023-08-16T19:34:16+5:302023-08-16T19:35:59+5:30

भाजप नेत्या सना खान हत्याकांडची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. सणाचा नर्मदा नदीवरील शेवटचा व्हिडिओ बघाच, लोकमतच्या हाती लागले सणाच्या लग्नाचे फोटो.

Sana Khan's body was thrown in Narmada river, where she went for a walk; Watch the video | ज्या नदीकिनारी फिरायला गेली, तिथेच फेकला सना खानचा मृतदेह; पाहा व्हिडिओ...

ज्या नदीकिनारी फिरायला गेली, तिथेच फेकला सना खानचा मृतदेह; पाहा व्हिडिओ...

सुरभी शिरपूरकर

नागपूरनर्मदा जी के दर्शन कीजिए.. जय नर्मदा मैया...असे म्हणत आपल्या फेसबुक फॉलोवर्स आणि आणि फेसबुक फ्रेंड्स ला.. नर्मदा नदीचे दर्शन घडविणारी सना खान.. याच नदीमध्ये सना खानची हत्या करून तिला फेकण्यात आले.

भाजप नेत्या सना खान हत्याकांडची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. तिची हत्या तिचाच पती आणि बिझनेस पार्टनर अमित उर्फ पप्पू साहू याने केल्याचे उघड झाले आहे. सणाच्या डोक्यात बांबू मारुन तिची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह आपल्या साथीदाराच्या मदतीने हिरेन नदीत फेकलेय्चा कबुली पप्पू साहूने दिली आहे. यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि सणाचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. 

पाहा व्हिडिओ:-

हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय, तो जबलपूरमधील नर्मदा नदीच्या बर्गी डॅम चा आहे. सना खान 20 सप्टेंबर 2021 ला जबलपूर मधील याच बर्गी डॅमवर फिरायला गेली होती. यादरम्यान तिने फेसबुक लाईव्ह केले होते. या  लाईवमध्ये आपण आपल्या मुलासह नर्मदा नदीच्या बर्गी डॅम येथे फिरायला आल्याची माहिती सणाने दिली होती. तसेच जय नर्मदा मैया .. असा  जयघोषही या व्हिडिओमध्ये सना करताना दिसते. मात्र एके दिवशी आपली हत्या करुन याच नर्मदा नदीत आपला मृतदेह फेकण्यात येईल, असा विचारही सणाने कधी केला नसेल. 

सना खान हत्या प्रकरणाला 14 दिवस लोटून गेले, मात्र अद्यापही सणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नाही. जबलपूर येथील रहिवासी असलेला अमित साहू हा वाळू तस्कर आणि दारू माफिया आहे. साहूने सना खान हिच्याशी एप्रिल महिन्यात लग्न केले होते. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो लोकमतच्या हाती लागले आहे. दरम्यान अमित साहू हा आधीच विवाहित होता. अमितची पत्नी मध्य प्रदेश पोलिस दलात नोकरीवर आहे. त्याच्या पत्नीला सणाशी असलेल्या पतीच्या प्रेम संबंधाबद्दल बाबत माहिती मिळाली, त्यामुळे दोघात वाद झाले आणि ती अमित पासून वेगळी राहू लागली. 

दरम्यान, सना खान अधून मधून अमितला जबलपूर मध्ये भेटायला जात असे. दोन ऑगस्टला अमितचा पैशांवरून सना खानशी वाद झाला आणि त्या वादातून अमितने सनाचा खून करुन मृतदेह हिरन नदीत फेकून दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. सध्या सना खान खून प्रकरणी पोलिसांचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. अमितने ज्या घरात सणाची हत्या केली, तिथे पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांचेही पथक बोलविण्यात आले आहे. 

Web Title: Sana Khan's body was thrown in Narmada river, where she went for a walk; Watch the video