मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण द्या; अबू आझमी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 12:09 IST2022-12-21T12:08:23+5:302022-12-21T12:09:00+5:30
कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्ता असताना मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला होता.

मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण द्या; अबू आझमी यांची मागणी
Maharashtra Winter Session 2022: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सीमावादाचा मुद्दा आणि नागपूर कथित भूखंड घोटाळ्याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून आक्रमकपणे केली जात आहे. मात्र, अशातच समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्ता असताना मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला होता. नंतरच्या सरकारने मात्र त्यावर अमल केला नाही. परंतु समाजवादी पार्टी सातत्याने मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन, मोर्च काढत आली आले आहे. वेगवेगळ्या समित्यांना मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. आता शिंदे मुख्यमंत्री असून सर्व वर्गाला न्याच देण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"