शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

सलील देशमुखांना दोन मिनीट उशीर झाल्याने अर्ज भरणे हुकले

By कमलेश वानखेडे | Updated: October 28, 2024 18:14 IST

रॅलीमुळे उशीरा पोहचले : मंगळवारी भरणार अर्ज

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोलमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सलील देशमुख सोमवारी सकाळी रॅलीने निघाले. मात्र, रॅलीत बराच वेळ गेला व अर्ज भरण्यासाठी उपविभागीय कार्यालयात पोहचले तेव्हा दोन मिनीट उशीर झाला होता. त्यामुळे ते अर्ज भरू शकले नाही. आता मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील.

विशेष म्हणजे २०१९ मध्ये सलील यांचे वडील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतही असाच किस्सा घडला होता. त्यामुळे त्यांनीही दुसऱ्या दिवशी जाऊन अर्ज सादर केला होता. सलील रॅलीने अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. तीन वाजायला काही मिनीटे उरली असताना त्यांच्या लक्षात आले की आता रॅलीने वेळेत पोहचणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकीवर बसून कार्यालय गाठले. पण तोवर दोन मिनीटे उशीर झाला होता. यानंतर सलील देशमुख यांनी मंगळवारी आई-वडील आणि मित्र पक्षांच्या नेत्यांसह येऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.

मी लढलो असतो तर माझ्यावर केसेस लावल्या असत्या : अनिल देशमुखमाझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावून मला १४ महिने तुरुंगात डांबण्यात आले. माझ्यासोबत घडलेल्या घटनाक्रमावर मी पुस्तक लिहिले असून ते दोन दिवसात येईल. मी पुन्हा निवडणूक लढलो असतो तर माझ्यावर आणखी खोट्या केसेस लावण्यात आल्या असत्या. त्यामुळे मी स्वत: न लढता पूत्र सलील यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले, असा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केला. शरद पवार हे आपल्याला विधान परिषदेवर घेतील. महाविकास आघाडीचे सरकार येताच मंत्रीही करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Salil Deshmukhसलिल देशमुखAnil Deshmukhअनिल देशमुखmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरkatol-acकाटोल