शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
3
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
5
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
6
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
7
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
8
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
9
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
10
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
11
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
12
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
13
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
14
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
15
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
16
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
17
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
18
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

साकोलीचे भाजपा आमदार काशिवार यांची निवडणूक रद्द; हायकोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 5:01 AM

सरकारी कंत्राटदारीमुळे अपात्रता; काँग्रेसच्या माजी आमदाराने दाखल केली होती याचिका

नागपूर : गेल्या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले भाजपाचेआमदार राजेश लहानू ऊर्फ बाळा काशिवार हे मुळात निवडणूक लढविण्यासच अपात्र होते, असा निष्कर्ष काढून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी त्यांची निवडणूक रद्द केली.काँग्रेसचे माजी आमदार सेवकभाऊ निर्धंगे वाघाये-पाटील यांनी केलेली निवडणूक याचिका अंशत: मंजूर करून न्या. अतुल चांदूरकर यांनी हा निकाल दिला. या निकालाविरुद्ध काशिकर यांना सर्वोच्च न्यायालयात हक्काचे अपील करण्यास वेळ मिळावा यासाठी न्या. चांदूरकर यांनी आपल्या निकालाचा प्रभाव ३० दिवसांसाठी तहकूब ठेवला. मुख्य न्यायाधीशांनी ही याचिका न्या. चांदूरकर यांच्याकडे १७ जुलै रोजी सोपविली होती. त्यानंतर बरोबर तीन महिन्यांत सुनावणी पूर्ण करून हा निकाल दिला गेला, हे लक्षणीय आहे.लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ९-ए अन्वये सरकारी कंत्राटदार विधिमंडळ आणि संसदेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो. काशिवार हे सरकारी कंत्राटे घेणारे व्यावसायिक कंत्राटदार आहेत. २७ सप्टेंबर २०१४ ही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यादिवशी काशिवार यांनी घेतलेल्या दोन कंत्राटांची कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली होती तरी कंत्राटांमधील अटींनुसार त्यांचे सरकारशी असलेले कंत्राटदाराचे नाते संपुष्टात आलेले नव्हते. म्हणजेच सरकारी कंत्राटदार या नात्याने ते निवडणूक लढविण्यास अपात्र होते, असा निष्कर्ष काढून न्यायालयाने निवडणूक अवैध ठरवून रद्द केली.पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व रेंजमध्ये वाघांच्या बछड्यांसाठी कुंपणभिंतीचे बंदिस्त आवार बांधणे, भंडारा शहरात वरठी आणि नागपूरमधील डागा इस्पितळातील मेट्रो रक्तपेढीचा विस्तार व नूतनीकरण अशा काशिवार यांनी काम केलेल्या चार कंत्राटांसंबंधीत ही याचिका करण्यात आली होती. त्यापैकी पेंच व्याघ्र प्रकल्पातील व मेट्रो रक्तपेढीच्या कंत्राटांच्या संदर्भात त्यांची अपात्रता सिद्ध झाल्याचे न्यायालयाने म्हटले. १९ आॅक्टोबर २०१४ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काशिवार यांनी २० आॅक्टोबर २०१४ रोजी कंत्राटदाराचे लायसन्स रद्द करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, २२ आॅक्टोबर २०१४ रोजी त्यांचे लायसन्स रद्द करण्यात आले होते.५० टक्के अनामत रक्कम ठेवली होती राखूनकाशिवार यांनी या चारही कंत्राटांचे काम निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या बरेच महिने आधी पूर्ण केले होते व संबंधित अभियंत्यांनी त्यांना तसे प्रमाणपत्रेही दिले होते. तरीही कंत्राटामधील दोन अटींमुळे त्यांची निवडणूक रद्द झाली. एक म्हणजे, कंत्राट पूर्ण झाले तरी त्या कामात काही त्रुटी किंवा दोष आढळले तर ते स्वखर्चाने दुरुस्त करून देण्याचे बंधन कंत्राटदारावर १२ किंवा २४ महिने असते. दोन कंत्राटांच्या बाबतीत ही मुदत संपलेली नव्हती. दोन, हा बंधनकाळ संपेपर्यंत काशिकर यांनी भरलेल्या अनामत रकमेपैकी ५० टक्के रक्कम सरकारने राखून ठेवली होती.

टॅग्स :MLAआमदारBJPभाजपाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट