शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

ग्रामीण भागात आतापर्यंत २,१०४ कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत्यूंचे प्रमाण अधिक ...

सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील १९ रुग्णांचा मृत्यू झाली. त्यामुळे मृतांची संख्या २,१०४ इतकी झाली. ग्रामीण भागात ४,७५१ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आली. त्यात १,२०० (२५.२५ टक्के) रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता १,३३,०३४ इतकी झाली आहे. यापैकी १,०९,६१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ही संख्या ३,०६७ इतकी होती. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २१,२४३ इतकी आहे. सावनेर तालुक्यात ४४ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील ३ तर ग्रामीणमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ३९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

नरखेड तालुक्यात १०९ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर शहरातील १३ तर ग्रामीण भागातील ९६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,३३१ तर शहरात ४७५ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (२५), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (८), मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ६३ रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यात ४११ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील १८ तर ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्रांतर्गत ५ कोंढाळी केंद्र (१३) तर येनवा केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात १२ रुग्णांची नोंद झाली.

कुही तालुक्यात विविध केंद्रांवर १३९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे ३, मांढळ (६), वेलतूर (५), साळवा (४) तर तितूर येथील ८ रुग्णांचा समावेश आहे.

रामटेक तालुक्यात २३ रुग्णांची भर पडली. यात शहरातील १ तर ग्रामीण मधील २२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,३७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यातील ५,१८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,१९० इतकी झाली आहे. उमरेड तालुक्यात ८१ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २५ तर ग्रामीण भागातील ५६ रुग्णांचा समावेश आहे.

हिंगणा तालुक्यात ३४३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे सर्वाधिक ९ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,२०० रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ९,०८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाली. त्यामुळे मृतांची संख्या २४६ इतकी झाली आहे.

कळमेश्वर तालुक्यात पुन्हा स्फोट

कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढतो आहे. तालुक्यात २५० रुग्णांची आणखी भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील १६३ तर ग्रामीण भागातील ८७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात तेलकामठी येथे सर्वाधिक ८ रुग्णांची नोंद झाली.