यंदापासून संघाचा तृतीय वर्ष नव्हे तर कार्यकर्ता विकास वर्ग-२; १७ मे पासून होणार सुरुवात

By योगेश पांडे | Published: May 15, 2024 10:16 PM2024-05-15T22:16:07+5:302024-05-15T22:16:31+5:30

यंदापासून या वर्गातील अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे

RSS News From this year, not the third year of the union, but the worker development class-2; It will start from May 17 | यंदापासून संघाचा तृतीय वर्ष नव्हे तर कार्यकर्ता विकास वर्ग-२; १७ मे पासून होणार सुरुवात

यंदापासून संघाचा तृतीय वर्ष नव्हे तर कार्यकर्ता विकास वर्ग-२; १७ मे पासून होणार सुरुवात

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला १७ मे पासून नागपुरातील रेशीमबाग परिसरात सुरुवात होत आहे. यंदापासून या वर्गातील अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, त्याला कार्यकर्ता विकास वर्ग-२ असे नाव देण्यात आले आहे.

संघाच्या संघटनात्मक बांधणीत प्रशिक्षणवर्गांना फार महत्त्व आहे. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात आयोजित हा वर्ग २५ दिवस चालणार आहे. १० जून रोजी संपणार आहे. या वर्गात या शिबिरात पूर्वीच्या सर्व वर्गांचे प्रशिक्षण घेतलेले देशभरातील स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. प्राथमिक शिक्षण वर्ग विविध प्रांतात होतात. मात्र तृतीय वर्ष वर्ग केवळ नागपुरातच आयोजित होतो. या वर्गानंतरच स्वयंसेवकांना संघाची जबाबदारी दिली जाते. या वर्षीपासून स्वयंसेवकांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्वयंसेवकाला स्वयंसेवकांना ज्या क्षेत्रात रस असेल, त्यानुसार प्रशिक्षण दिले जाईल.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह अखिल भारतीय अधिकारी या वर्गात सहभागी होतील. वर्गादरम्यानच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असल्याने त्यानंतर सरसंघचालक काय भाष्य करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

Web Title: RSS News From this year, not the third year of the union, but the worker development class-2; It will start from May 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.