शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लूटमार, चोरीच्या गुन्ह्यांचा लावला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:11 IST

नागपूर : बजाजनगर पोलिसांनी चोरी, घरफोडी आणि लूटमारीच्या पाच घटनांचा छडा लावून चार आरोपींना अटक केली असून तीन अल्पवयीन ...

नागपूर : बजाजनगर पोलिसांनी चोरी, घरफोडी आणि लूटमारीच्या पाच घटनांचा छडा लावून चार आरोपींना अटक केली असून तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

वनिता मातादिन मोरे (५१) आणि पूजा सुनील भोवरे (२५, रा. डिप्टी सिग्नल) या ३० ऑगस्टला चित्रकला महाविद्यालयाजवळ चोरी करताना रंगेहाथ सापडल्या. तसेच लक्ष्मीनगरच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत काम करीत असलेल्या मजुराचा मोबाइल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले आहे. सुरेंद्रनगर येथील रहिवासी किशोर जाजू २५ ऑगस्टला रात्री घराजवळ फिरत होते. त्यांचा मोबाइल ॲक्टिव्हावर आलेल्या दोन आरोपींनी हिसकावून पळ काढला होता. २४ ऑगस्टला वकील सुमंत देवपुजारी शंकरनगर चौकातून दुचाकीने जात होते. त्यांच्या खिशातून मोबाइल चोरी करण्यात आला. दोन्ही घटनांत तपिश राहुल बागडे (१९, रा. हरिजन कॉलनी, बेझनबाग) आणि वृषभ चंद्रशेखर कावळे (२०, रा. नझुल ले आऊट) यांना त्यांच्या अल्पवयीन साथीदारासह पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून २ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शुभांगी देशमुख, उपनिरीक्षक पराग फुलझेले, शीतल राणे, दिशा पाटील, गोविंदा बारापात्रे, गौतम रामटेके, अरुण कांबे, सतीश ठाकूर, विनोद द्विवेदी, अमित गिरडकर, सुरेश वरुडकर, सुभाष गजभिये यांनी केली.

.............