शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे काऊंटरवरच्या रांगांभोवती समाजकंटकांची घुटमळ; प्रवाशांची गर्दी, महिला वृद्ध, दिव्यांगांना मनस्ताप

By नरेश डोंगरे | Updated: August 24, 2023 13:55 IST

एकच काउंटर : सुरक्षेसाठी येथे पोलीस किंवा आरपीएफचे जवान दिसत नाहीत

नरेश डोंगरे 

नागपूर : रेल्वे तिकिटांच्या बुकिंगचे एकच काऊंटर सुरू असल्याने काउंटरवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी पाहून समाजकंटकही तेथे घुटमळू लागले आहेत. परिणामी वृद्ध, महिला आणि दिव्यांगांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे अनुचित घटना होण्याचाही धोका आहे.

येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या मुख्य पश्चिम द्वारावर चार तर संत्रा मार्केटकडच्या पूर्व द्वारावर दोन तिकिट काउंटर आहे. या सहा पैकी तीन काउंटर शिफ्टमध्ये सुरू असतात. तर तीन नेहमीसाठी सुरू असतात. संत्रा मार्केटकडच्या दोन काऊंटर पैकी एकच काऊंटर (शिफ्ट मधीळ) गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे तिकिट काढणाऱ्या प्रवाशांची या काउंटरवर मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात सुरक्षेसाठी येथे पोलीस किंवा आरपीएफचे जवान दिसत नाहीत. त्यामुळे महिला प्रवाशांची गर्दी झाल्याचे पाहून चोर-भामटे, समाजकंटक आणि मजनूगिरी करणारेही येथे घुटमळत असल्याच्या तक्रारी आहेत.

या संबंधाने भारतीय यात्री केंद्राकडे प्रवाशांच्या अनेक तक्रारी आल्याचे पाहून यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे आणि अन्य वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. वृद्ध,आजारी आणि दिव्यांगांची एकाच काउंटरवर गर्दी दिसत असल्याने आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ किंवा रेल्वे पोलीस दिसत नसल्याने अनुचित प्रकार घडण्याची भिती या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. अनेक प्रवासी तिकीट न काढताच परत जात असल्याचे सांगून शुक्ला यांनी रेल्वेचे बंद तिकिट काउंटर सुरू करावे, अशी विनंतीही अधिकाऱ्यांना या तक्रार वजा निवेदनातून केली आहे.

अधिकारी म्हणतात...

या संबंधाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता तिकिट काउंटर सुरू असून, प्रवाशांना त्रास होत असेल तर योग्य व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाnagpurनागपूर