शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नागपुरात  रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त कारवाई सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 10:58 PM

महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात झाली. प्रवर्तन विभागाच्या पथकाने एकाचवेळी सहा झोनमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.

ठळक मुद्दे१५० अतिक्रमण हटविले : तीन ट्रक साहित्य जप्तविरोधाला न जुमानता महाल येथील अतिक्रमणाचा सफायाएकाचवेळी सहा झोनमध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात झाली. प्रवर्तन विभागाच्या पथकाने एकाचवेळी सहा झोनमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. महाल परिसरात ५० ते ६० लोकांच्या जमावाने पथकाची कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काहीवेळ तणावही निर्माण झाला होता. परंतु विरोधाला न जुमानता या परिसरातील अतिक्र मण हटविण्यात आले.

शहराच्या विविध भागातील फूटपाथवरील १५० हून अधिक अतिक्रमण हटवून, तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.महाल येथील महापालिका कार्यालयाच्या परिसरात तसेच कल्याणेश्वर मंदिर परिसरात रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविताना ६० ते ७० विक्रेत्यांनी कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटविण्यात आले. नरसिंग टॉकीज ते घाटे दुग्ध मंदिर ते कोतवाली चौक, कल्याणेश्वर मंदिर ते झेंडा चौक, झेंडा चौक ते लाकडी पूल, पुढे बडकस चौक यादरम्यानचे ७५ अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच मंगळवारी झोनच्या पथकाने अवस्थीनगर येथील फूटपाथवर लावण्यात आलेली दुकाने हटविली. 
धरमपेठ झोनधरमपेठ झोन क्षेत्रातील लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौकदरम्यानच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण हटविले. तसेच गोकुळपेठ मार्केट परिसरातील फूटपावरील अतिक्रमणाचा सफाया क रण्यात आला. 

सतरंजीपुरा झोनसतरंजीपुरा झोनच्या पथकाने दहीबाजार पूल ते मच्छी बाजार पूल पुढे कावरापेठ ते इतवारी रेल्वे क्रॉसिंग या दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथ मोकळे करण्यात आले. विक्रे त्यांचे एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. 

लकडगंज झोन

 प्रवर्तन विभागाच्या पथकाने लकडगंज झोन क्षेत्रातील छाप्रूनगर चौक ते वर्धमाननगर चौक ते वैष्णवदेवी चौक ते प्रजापतीनगर चौक पुढे जुना पारडी नाका ते सुभाननगर चौक ते जय जलाराम गेटपर्यंतच्या फूटपाथवरील ३५ अतिक्रमण हटविले. पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले.

हनुमाननगर झोन

 अतिक्रमण विरोधी पथकाने हनुमान नगर झोन क्षेत्रातील तुकडोजी पुतळा चौक ते सिद्धेश्वर हॉल ते मानेवाडा चौक या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवरील २३ अतिक्रमण हटविले.

पाच सहायक आयुक्त सहभागीया कारवाईत प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, हरीश राऊ त, प्रवर्तन विभागाचे निरीक्षक संजय कांबळे, आदींच्या नेतृत्वात विविध झोन क्षेत्रात राबविण्यात आली. कारवाईत प्रवर्तन विभागातील शादाब खान, विशाल ढोले, आतीश वासनिक, माळवे यांच्यासह उपद्रव शोध पथकाचे जवान सहभागी झाले होते.  महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाईशहरातील नागरिकांच्या तक्रारी विचारात घेता व समितीच्या अहवालानुसार महापौर संदीप जोशी व आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाला  १ जानेवारीपासून शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार  प्रवर्तन विभागासह झोनच्या सहायक आयुक्तांनी अतिक्रमण हटविण्याचा कारवाईला सुरुवात केली. अतिक्रमण  हटवून विक्रेत्यांवर  दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण