शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

नागपुरात रस्ते अपघाताला आळा : गतवर्षीच्या तुलनेत अपघात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:08 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.

ठळक मुद्देवाहतूक व्यवस्थेतील सुधारणांचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.बेशिस्त वाहतूक व्यवस्थेमुळे गेल्या वर्षी अपघाताची संख्या वाढली होती. वारंवार अपघात घडत होते. ८ सप्टेंबर २०१८ पर्यंत उपराजधानीत १७८ जीवघेणे अपघात घडले होते. एकूण अपघाताची संख्या ६०९ होती. यावर्षी सप्टेंबर महिन्यांपर्यंत ५६१ अपघात झाले आणि मृत्यूसंख्या १६२ आहे.शहरातील काही मार्गांवर वारंवार अपघात घडतात. अशी एकूण ८३ ठिकाणे अधोरेखित करून वाहतूक पोलिसांनी त्यातील ४० ठिकाणांना ब्लॅक स्पॉट तर ४३ ठिकाणांना हॉट स्पॉट ठरवले. या सर्व ठिकाणी पुन्हा अपघात घडणार नाही, यासाठी ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या केल्या.काय आहे हॉट आणि ब्लॅक स्पॉटज्या ठिकाणी गंभीर अपघात घडतात त्या ठिकाणांना हॉट आणि ज्या ठिकाणी जीवघेणे अपघात घडले त्याला ब्लॅक स्पॉट ठरवत वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा दलाच्या मदतीने वाहनचालकांना रस्त्यारस्त्यावर वाहतुकीचे धडे दिले. त्याचाच परिणाम म्हणून १६२ अपघात कमी झाले.आयुक्तांच्या संकल्पाला प्रयत्नांची जोडनागपूरला अपघातमुक्त शहर बनविण्याचा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संकल्प केला होता. अपघात रोखण्यासाठी जनजागरण, रॅली तसेच शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी वाहतूक शाखेची धुरा हातात घेतल्यानंतर बेशिस्त वाहतुकीला वळणावर आणण्याचे प्रयत्न चालविले. त्याचाही चांगला परिणाम उपरोक्त आकडेवारीतून दिसून येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातtraffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर