फेकलेल्या मास्कमधून संसर्ग वाढण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:54 AM2020-03-17T10:54:46+5:302020-03-17T10:56:06+5:30

महानगरपालिकेने अद्यापही मास्क संकलन केंद्र सुरू केले नाही. यामुळे वापरलेले मास्क रस्त्यावर फेकले जात आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे.

Risk of infection increases with thrown masks | फेकलेल्या मास्कमधून संसर्ग वाढण्याचा धोका

फेकलेल्या मास्कमधून संसर्ग वाढण्याचा धोका

Next
ठळक मुद्देकोरोनाला कसा घालणार प्रतिबंध मास्क विल्हेवाटीची सोयच नाहीमनपाने उघडावे मास्क संकलन केंद्र

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णासोबत संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क वापरणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, मास्क कोणी वापरावेत, कसे वापरावेत, ते कुठे टाकावेत यावर व्यापक जनजागृती नाही. यामुळे गोंधळ उडाला आहे. महानगरपालिकेने अद्यापही मास्क संकलन केंद्र सुरू केले नाही. यामुळे वापरलेले मास्क रस्त्यावर फेकले जात आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे.
कोरोना लागण होण्यासाठी ‘कोव्हिड-१९’ हा विषाणू कारणीभूत ठरतो. हा विषाणू श्वसनमार्गाने शरीरात प्रवेश करतो. कोरोना लागण झालेल्या रुग्णांच्या शिंकांतून, खोकल्यातून किंवा त्यांच्या थुंकीतून हा विषाणू इतरांमध्ये पसरतो. म्हणूनच जागतिक आरोग्य विभागाने (डब्ल्यूएचओ) सर्दी, खोकला व ताप असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मास्क घालण्याची शिफारस केली आहे. हा श्वसन रोगाचा प्रसार मर्यादिीा करण्यासाठी वारंवार हात धुणे व तोंड झाकणे प्रतिबंधक उपाय आहे.

मास्कची अशी घ्या काळजी
‘डब्ल्यूएचओ’नुसार, मास्क लावण्यापूर्वी अल्कोहोल आधारित सॅनिटायझर हातात घेऊन तो मास्कला चोळावा किंवा साबणाने स्वच्छ करावा.
आपले नाक, तोंड आणि चेहरा पूर्णत: झाकला जाईल, असा मास्क असावा.
मास्क वापरल्यानंतर त्याला स्पर्श करणे टाळावे.
स्पर्श करण्याची गरज असल्यास सॅनिटायझरने किंवा साबणाने हात धुतल्यावरच मास्कला स्पर्श करा.
मास्क ओलसर होताच तो बदलून टाकायला हवा.
वापरलेला मास्क पुन्हा वापर करू नये.
मास्क काढताना तो मागून काढावा म्हणजेच मास्कच्या पुढील भागाला स्पर्श करू नका.
मास्क हळुवारपणे काढा, जेणेकरून मास्कवरील द्रव आणि दूषित घटक कपड्यांवर पडणार नाहीत.
मास्क काढल्यानंतर अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात धुवा. त्यानंतरच नवीन मास्क घाला.

Web Title: Risk of infection increases with thrown masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.