शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येने गुरुवारी पुन्हा उच्चांक गाठला. १० ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच ६४४ नव्या कोरोनाबाधितांची ...

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येने गुरुवारी पुन्हा उच्चांक गाठला. १० ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच ६४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. ६ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या १४१०२८ झाली असून मृतांची संख्या ४२५३ वर पोहचली. विशेष म्हणजे, सध्याच्या घडीला ५ हजारावर कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत.

नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दैनंदिन हजारावर गेलेली रुग्णसंख्या ऑक्टोबर महिन्यात कमी होऊ लागली होती. ५०० ते ७०० दरम्यान रुग्ण दिसून येत होते. नोव्हेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या आणखी कमी होऊन २००च्या खाली आली होती. डिसेंबर महिन्यात मात्र यात किंचित वाढ होऊन ३५० ते ४०० दरम्यान तर जानेवारी महिन्यात ४०० ते ४५० दरम्यान रुग्णसंख्या गेली. फेब्रुवारी महिन्याचा पहिल्या आठवड्यात २५० ते ३५० दरम्यान असलेली रुग्णसंख्या ११ फेब्रुवारीला ५०० वर गेली. तेव्हापासून सलग सहा दिवस बाधितांची संख्या ४००वर तर तीन दिवस ५०० वर होती. आज ६०० वर गेली असून पुढील काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञानी वर्तवली आहे.

-आरटीपीसीआर व अँटिजेन मिळून ६७७५ चाचण्या

४३४९ आरटीपीसीआर तर २४२६ रॅपीड अँटिजेन मिळून आज ६७७५ कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात आरटीपीसीआरमधून ६२३ तर अँजिटेनमधून २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सर्वाधिक, १०६२ चाचण्या मेडिकलच्या प्रयोगशाळेत करण्यात आल्या. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात ११४४५९३ चाचण्या झाल्या.

-शहरात ५७४, ग्रामीणमध्ये ६७ बाधित

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरात ५७४, ग्रामीणमध्ये ६७ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरात ३, ग्रामीणमध्ये १ तर जिल्हाबाहेरील ३ मृत्यू आहेत. आतापर्यंत शहरात ११२४८९ रुग्ण व २७५६ मृत्यू, ग्रामीणमध्ये २७६२२ रुग्ण व ७६२ रुग्णांचे बळी गेले. आज २५० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १३१६७० रुग्णांनी कोरोनावर मात केली.

-अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येने वाढवली चिंता

नागपूर जिल्ह्यात दरम्यानच्या काळात रुग्णसंख्या रोडावली असलीतरी अ‍ॅक्टीव्ह म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्या ३००० ते ४००० दरम्यान कायम होती. गुरुवारी ही संख्या ५१०५वर गेल्याने चिंता वाढली आहे. यातील १६१२ रुग्ण रुग्णालयात तर ३४९३ रुग्ण गृह विलगीकरण म्हणजे होम आयसोलेशनमध्ये आहे.

-दैनिक चाचण्या : ६७७५

-बाधित रुग्ण : १४१०२८

_-बरे झालेले : १३१६७०

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५१०५

- मृत्यू : ४२५३