'दंगखोर चौकशीसाठी येणार, हे अक्षरशः पाय चाटणे आहे'; CM फडणवीसांनी मांडला गंभीर मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:16 IST2025-03-22T15:15:06+5:302025-03-22T15:16:06+5:30
Nagpur Latest News: नागपूरमध्ये दंगल झालेल्या भागांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेण्यासाठी काँग्रेसच्या समितीने पाहणी केली. या समितीतील एका सदस्याबद्दल गंभीर मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

'दंगखोर चौकशीसाठी येणार, हे अक्षरशः पाय चाटणे आहे'; CM फडणवीसांनी मांडला गंभीर मुद्दा
Nagpur Riots Latest News: नागपूरमध्ये १७ मार्च रोजी दंगल झाली. ज्या भागात हिंसाचार झाला, त्या भागांतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती शनिवारी भागांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. समितीतील एका सदस्यांबद्दल मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसची ही समिती म्हणजे अक्षरशः लांगूनचालन आहे. हे पाय चाटणे आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नागपूरमध्ये १७ मार्च रोजी दंगल झाली. ज्या भागात दंगल झाली आहे, त्या भागांना भेटी देऊन काँग्रेस परिस्थितीची जाणून घेणार आहे. शनिवारी ही समिती नागपूरमध्ये आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. काँग्रेसची समिती पाहणी करण्यासाठी आली आहे. ते राजकारण करत आहेत, असे वाटते का? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला.
दंगलीतील आरोपी काँग्रेस समितीचा सदस्य -फडणवीस
या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काँग्रेसची समिती किती गंभीर आहे, याचे एकच उदाहरण मी देतो की, ज्याच्यावर अकोला दंगलीचा आरोप आहे. त्या दंगलीचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य. म्हणजे आता दंगेखोर हे जर दंगलीची चौकशी करण्यासाठी येणार असतील, तर ही समिती म्हणजे अक्षरशः लांगूनचालन आहे. पाय चाटणे आहे", अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या समितीवर केली.
काँग्रेसच्या समितीत कोण-कोण?
काँग्रेसने नियुक्ती केलेल्या समितीत माजी प्रदेशाध्यक्ष, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण हे या समितीचे सदस्य आहेत.
नागपूरच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत.
काँग्रेसची समिती नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाऊन पाहणी, स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार
मुंबई, दि. २० मार्च २५
नागपुरमध्ये सोमवारी रात्री हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या… pic.twitter.com/GjeTs6RRpZ— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 20, 2025
नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक आहेत, तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील समन्वय आहेत.