खरबी व पिपळा येथे अंगणवाडी सेविकांची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:08+5:302021-09-23T04:11:08+5:30

खरबी : नागपूर ग्रामीण तालुक्यातील खरबी सर्कलचे जि. प. सदस्य सुभाष गुजरकर यांनी बुधवारी खरबी व पिपळा येथील अंगणवाडी ...

Review meeting of Anganwadi workers at Kharbi and Pipla | खरबी व पिपळा येथे अंगणवाडी सेविकांची आढावा बैठक

खरबी व पिपळा येथे अंगणवाडी सेविकांची आढावा बैठक

googlenewsNext

खरबी : नागपूर ग्रामीण तालुक्यातील खरबी सर्कलचे जि. प. सदस्य सुभाष गुजरकर यांनी बुधवारी खरबी व पिपळा येथील अंगणवाडी सेविकांची आढावा बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. बैठकीत सर्व शासकीय योजनांची माहितीसुद्धा देण्यात आली. समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अपंगांच्या योजना, आंतरजातीय विवाह योजना, माता जिजाऊ अर्थ साहाय्य योजना, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता व्यक्तिगत लाभांच्या योजना, महिला व बालकल्याणकारी योजना, शिक्षण विभागाच्या योजना, आदी अनेक योजनांची माहिती देण्यात आली. यासोबतच अंगणवाडीमध्ये मुलांना देणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी अंगणवाडी पर्यवेक्षिका माया भुसारी, पं. स. सदस्या वैशाली भोयर, सरपंच नरेश भोयर, ग्राम विस्तार अधिकारी धारपुरे, आदी उपस्थित होते.

Web Title: Review meeting of Anganwadi workers at Kharbi and Pipla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.