शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अभियान महिला सक्षमीकरण म्हणून राबवणार

By admin | Updated: July 31, 2016 02:41 IST

येत्या १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महाराजस्व अभियान हे महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती....

 १ ते ७ आॅगस्टपर्यंत विशेष मोहीम : विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची माहिती नागपूर : येत्या १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महाराजस्व अभियान हे महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. यावर्षीचे महसूल अभियान हे महिला सक्षमीकरण म्हणून राबविण्यात येणार असून ‘ताई, मावशी, आक्का आता जग जिंका’ असे घोषवाक्य असून या सप्ताहभरात जिल्हा, तालुका व गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण सप्ताह दरम्यात लक्ष्मी-मुक्ती योजनेंतर्गत ७/१२ उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्कांची नोंद करणेसाठी विशेष मोहीम राबविणे, वारस नोंदी करतांना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास तर नव्याने वारस नोंद घेणे, तसेच महिला खातेदारांच्या अधिकार अभिलेख विषयीचे अर्जावर प्राधान्याने कारवाई करणे, महिला खातेदारांच्या वहिवाट किंवा पांदण रस्त्यांसंदर्भात असलेल्या तक्रारीवर प्राधान्याने कारवाई करणे, महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यास विशेष मोहीम राबविणे, रोजगार हमी योजनेतील महिला जॉबकार्ड धारकांना विशेष मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे, शिधापत्रिकेवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नोंदणी करणे, मतदार यादीमध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुली व मतदार नोंदणी न झालेल्या महिलांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविणे, महिला खातेदारांचा अधिकार अभिलेख विषयीचे अर्जावर प्राधान्याने कारवाई करणे, वन जमिनीचे पट्टे वाटप करणे, उज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन देणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे व विविध योजनांची माहिती देणे, महिलांना आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र देणे, ग्रामपंचायत मधील नमुना ८-अ मध्ये पतीच्या नावासोबत महिलांच्या नावाची नोंद करणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवेच्या नावाने आॅटोरिक्षा परवाना देणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन वाटप आदी योजना राबवल्या जातील. (प्रतिनिधी)